शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

व्हिटॅमिन बी१२ शरीरात कमी होणं ठरू शकतं घातक, जाणून घ्या काय दिसतात लक्षणे!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2024 10:28 AM

1 / 9
Vitamin Deficiency : शरीराचं कामकाज सुरळीत चालावं यासाठी शरीराला वेगवेगळ्या व्हिटॅमिन्स आणि मिनरल्सची गरज असते. तसे तर सगळेच व्हिटॅमिन्स शरीरासाठी आवश्यक असतात. मात्र, यातील व्हिटॅमिन बी१२ अधिक महत्वाचं असतं. व्हिटॅमिन बी१२ ला फोलेट सुद्धा म्हटलं जातं. याद्वारेच लाल रक्तपेशी ऑक्सीजनच्या मदतीने शरीरात रक्त पोहोचवत असतात. जर लाल रक्तपेशी कमी झाल्या तर शरीराच्या टिश्यूज आणि अवयवांना योग्य प्रमाणात ऑक्सीजन मिळत नाही. अशात शरीर योग्यपणे काम करू शकत नाही.
2 / 9
इतकंच नाही तर व्हिटॅमिन बी१२ ची शरीरात कमतरता झाली तर एनीमियाची समस्या होऊ शकते. अशात वेळीच हे व्हिटॅमिन शरीरात कमी झाल्याचं ओळखून योग्य ती काळजी घेतली गेली पाहिजे. आज आम्ही तुम्हाला शरीरात हे व्हिटॅमिन कमी झाल्यावर शरीर काय संकेत देतं किंवा कोणती लक्षणे दिसतात हे सांगणार आहोत.
3 / 9
व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्या त्वचेवर पिवळेपणा दिसू लागतो. कारण हे व्हिटॅमिन कमी झालं तर शरीरात सगळीकडे व्यवस्थित रक्त पोहोचू शकत नाही. ज्यामुळे रक्त कमी झाल्याने त्वचा पिवळी दिसू लागते. चेहऱ्यासोबतच डोळ्यांमध्येही पिवळेपणा दिसू लागतो.
4 / 9
व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्यावर चेहऱ्यावर काही डाग दिसू लागतात. सोबतच सुरकुत्याही येतात. सोबतच त्वचेचा रंगही डार्क होऊ लागतो.
5 / 9
व्हिटॅमिन बी१२ शरीरात कमी झाल्यावर त्वचा रखरखती होते. तसेच चेहऱ्यावर किंवा त्वचेवर खाजही येते.
6 / 9
शरीरात व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्याची वेगवेगळी लक्षणं दिसू लागतात. याचं आणखी एक महत्वाचं लक्षण म्हणजे शरीर थंड पडू लागतं.
7 / 9
व्हिटॅमिन बी१२ कमी झाल्याने हात-पाय सुन्न पडू लागतात. तसेच या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे हात-पायांना झिणझिण्याही येऊ लागतात.
8 / 9
या व्हिटॅमिनच्या कमतरतेमुळे शरीरात ऊर्जा कायम राहते. जेव्हा हे व्हिटॅमिन कमी होतं तेव्हा शरीरात जास्त थकवा आणि कमजोरी जाणवू लागते.
9 / 9
व्हिटॅमिन बी१२ च्या कमतरतेमुळे ब्रेन फोगची समस्या होऊ शकते. ज्यात कन्फ्यूजन, कमी स्मरणशक्ती, डोकेदुखी, एंझायटी, डिप्रेशन आणि लक्ष केंद्रीत न करू शकणे या गोष्टींचा समावेश असतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य