Vitamin D is beneficial for prevent infection; How to get Vitamin D by food in take myb
संक्रणापासून बचावासाठी व्हिटामीन डी ची गरज; तर घरीच राहून 'असं' मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2020 5:29 PM1 / 7कोरोना व्हायरसमुळे जगभरातील लोकांमध्ये भीतीचं वातावरण तयाार झालं आहे. कोरोना व्हायरसवर अद्याप कोणतंही औषध अथवा लस विकसीत करण्यात आलेली नाही. अनेक देशांमध्ये लस शोधण्यासाठी प्रयत्न सुरु आहेत. कोरोनाशी लढण्यासाठी सोशल डिस्टेंसिंग मेटेंन ठेवण्यासोबतच रोगप्रतिकारकशक्ती वाढवणं सुद्धा गरजेचं आहे. अलिकडे व्हायरस इन्फेक्शनपासून बचावासाठी व्हिटामीन डी गरजेचं असल्याची माहिती समोर आली आहे. 2 / 7सुर्यप्रकाशामुळे व्हिटामीन डी मिळतं. पण लॉकडाऊनमुळे बाहेर जाता येत नाही तर व्हिटामीन डी कसे मिळणार असा प्रश्न अनेकांना पडला होता. कारण लॉकडाऊन असल्यामुळे अनेकजण लवकर उठायला कंटाळा करतात. बाहेरसुद्धा जात नाहीयेत. आज आम्ही तुम्हाला घरच्या घरी कोणत्या पदार्थाचे सेवन केल्यास व्हिटामीन डी मिळत याबाबत सांगणार आहोत.3 / 7व्हिटामीनच्या कमतरेमुळे ताप येणं, थकवा येणं, हाडं आणि पाठीत वेदना, मानसिक ताण, केस गळणं, मासंपेशीचं वेदना, अशी लक्षणं जाणवतात. याशिवाय हद्याचे ठोके वाढणं अशा समस्या उद्भवतात.4 / 7मशरूम : मशरुमचा आहारात समावेश केल्यामुळे व्हिटामीन डी स्तर व्यवस्थित राहतो. मशरूमच्या वेगवेगळ्या पदार्थांचा आहारात समावेश करून तुम्ही व्हिटामीन डी मिळवू शकता. 5 / 7पनीर : पनीर अनेकांना खायला खूप आवडतं. त्यात व्हिटामीन डी मोठ्या प्रमाणावर असते तर नियमीत पनीरचं सेवन केल्यास शरीरातील व्हिटामीन डी ची कमतराता भरून काढण्यास मदत होईल.6 / 7दही : दुधापेक्षा दही पचण्यास हलके असते. दह्याच्या सेवनाने पचनाशी निगडीत समस्या दूर होऊन शरीरातील व्हिटामीन डी ची कमतरता पूर्ण होते. 7 / 7सोयामिल्क : सोयामिल्कच्या सेवनाने शरीला व्हिटामीन डी मिळतं. याशिवाय यात अनेक पोषक घटक असतात. सोयामिल्कमध्ये आयर्न, प्रोटीन्स मोठ्या प्रमाणावर असतात. आणखी वाचा Subscribe to Notifications