want to extend your life by 20 years?
20 वर्षे जास्त जगायचंय?... 'या' दहा गोष्टी देतील दीर्घायुष्य By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2018 1:36 PM1 / 10चहाएेवजी कॉफी प्या... चहामध्ये मोठ्या प्रमाणात अँटी ऑक्सीडंट्स असतात. त्यामुळे हृद्यरोग, कर्करोगाशी सामना करण्यासाठी मदत होते आणि अकाली वृद्धत्त्वापासूनही बचाव करता येतो. एका अभ्यासावरुन चहामध्ये 15 टक्के अधिक आरोग्यवर्धक घटक असल्याचे दिसून आले आहे.2 / 10काजू-बदाम खा... दररोज काजू-बदामासारखे ड्रायफ्रूट्स खाणाऱ्या मंडळींच्या अकाली मृत्यूचे प्रमाण इतरांपेक्षा 20 टक्कयांनी कमी असते. हृदयरोग, कर्करोग आणि श्वसनासंबंधी विकार यामुळे कमी होतात असे तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासावरुन स्पष्ट झाले आहे.3 / 10टीव्ही कमी पाहा...अमेरिकेच्या नॅशनल कॅन्सर इन्स्टीट्यूटच्या तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार वयाच्या पंचविशीनंतर तुम्ही पाहिलेला टीव्हीचा प्रत्येक तास तुमच्या आयुष्याची 20 मिनिटे कमी करतो. टीव्हीमुळे तुम्ही एकाच जागी बसून राहाता, त्यामुळे स्नायूंचा योग्य वापर होत नाही, आजारी पडण्याचे प्रमाण वाढते.4 / 10व्हेज जेवण फायद्याचं... हॉर्वर्ड विद्यापिठात झालेल्या संशोधनानुसार हवाबंद डब्यांतील, प्रक्रीया केलेले मांस तसेच सॉसेजेस, बेकन यामुळे मृत्यू लवकर येतो. त्याएेवजी शाकाहार, भाज्या, फळे, कठिण कवचाची फळे खाण्यामध्ये असल्यास आरोग्य चांगले राहाते. 5 / 10मित्रांच्या संपर्कात राहा...कुटुंब आणि मित्रांशी संपर्क अधिकाधिक ठेवल्याने आयुष्य वाढते. मित्र तुम्हाला भावनिक आधार देत असतात. ताण कमी होतो. ऑक्सीटोसिन, डोपामाईनसारखी आनंद देणारी संप्रेरके यामुळे अधिक स्रवतात.6 / 1080 टक्के पोट भरलं की थांबा... जेवण म्हणजे नुस्तं पोट भरण नाही किंवा अतिरेकी खाणं नाही. जपानमधील ओकीनावा बेटावरील लोकांचं अायुष्यमान 100 वर्षांपर्यंत आहे कारण ते लोक 80 टक्के पोट भरलं की जेवण थांबवतात.7 / 10एकतरी गाणं म्हणा...हॉर्वर्ड आणि येल विद्यापिठाच्या संयुक्त अभ्यासातून नियमित गाणं म्हणणं हे आयुष्यवर्धक असल्याचे आढळून आले आहे. गाण्यामुळे तणाव कमी होतो, आरोग्य सुधारते.8 / 10पती-पत्नीचे शरीरसंबंध... महिन्याभरात एखादेवेळेस शरीरसंबंध ठेवणाऱ्या जोडप्यांचे आयुष्यमान कमी असते असे सर्वेक्षणावरुन सिद्ध झाले आहे.9 / 10रेड वाईन- दारु आरोग्यासाठी हानिकारक असते. अतिरिक्त दारु विविध आाजरांना आमंत्रणच देते. मात्र जर्नल ऑफ द अमेरिकन कॉलेज ऑफ कार्डिओलॉजीच्या अभ्यासातून योग्य प्रमाणात रेड वाईन (स्त्रियासांठी रोज एक आणि पुरुषांसाठी रोज दोन ग्लास) पिणाऱ्या लोकांना हृदयरोगाचा धोका कमी असल्याचे दिसून आले.10 / 10रात्री लवकर झोपा... झोप कमी झाल्यामुळे आरोग्यावर परिणाम होतो. शांत झोपेमध्ये झालेली थोडीशी वृद्धीसुद्धा आरोग्यवर्धक ठरू शकते. आणखी वाचा Subscribe to Notifications