warning signs of risk of early death
शरीरात दिसणारी 'ही' लक्षणे ठरु शकतात अकाली मृत्यूचे कारण, तज्ज्ञांनी दिला धोक्याचा इशारा By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2021 4:07 PM1 / 10शरीरात घडणाऱ्या अनेक छोट्या बदलांकडे किंवा लक्षणांकडे आपण अनेकदा दुर्लक्ष करतो, मात्र हीच लक्षणे एखाद्या व्यक्तीचे मृत्यूचे कारण ठरु शकतात. त्यामुळे प्रत्येक व्यक्तीने शरीरात होणाऱ्या काही बदलांकडे काळजीपूर्वक लक्ष देणे महत्त्वाचे आहे असे डॉक्टरांकडून सांगितले जाते. जेणेकरुन त्यावर वेळीच उपचार करत नियंत्रण मिळवता य़ेईल.2 / 10एका संशोधानातून संशोधकांनी असा दावा केला की, लवकर मृत्यू होणार असल्याचा इशारा आपल्याला मृत्यूच्या १० वर्षांपूर्वी पासूनच जाणवू लागतो. चालण्या- फिरण्यापासून शरीराच्या अनेक हालचालींद्वारे तुम्ही ही लक्षणे ओळखू शकता.3 / 10ब्रिटिश मेडिकल जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्य़ासात तज्ज्ञांनी सांगितले की, ‘६५ वर्षांपेक्षा जास्त वयात ‘फिजिकल मोटर फंक्शन ‘मध्ये बिघाड झाल्याने मृत्यू होण्याची जोखमी वाढते.4 / 10यावर तज्ज्ञांचे म्हणणे आहे की, खुर्चीवरून उठण्याच्या पद्धतीपासून व्यक्तीच्या हालचालीतून, चालण्याच्या गतीतून किंवा कमकुवत ग्रिप स्ट्रेंथ ही लक्षणे ओळखली जाऊ शकतात. सुरुवातीच्या टप्प्यात ही लक्षणे ओळखून तुम्ही त्यावर प्रतिबंधन घालू शकता.5 / 10तज्ज्ञांनी असाही दावा केली की, १९८५ ते १९८८ दरम्यान घेण्यात आलेल्या ३३ ते ५५ वर्षांच्या वयोगटातील ६००० स्वयंसेवकांवर केलेल्या अभ्यासावर हे संशोधन आधारित आहे. त्यानंतर २००७ आणि २०१६ दरम्यान याच स्वयंसेवकांचे तीन स्वतंत्र प्रसंगी शारीरिक मूल्यमापन करण्यात आले.6 / 10यात चालण्याची गती, खुर्चीवरून उठण्यासाठी लागणारा वेळ, ग्रिप स्ट्रेंथसह ड्रेसिंग, शौचालयचा वापर करणे, स्वयंपाक किंवा किराणा खरेदी यासारख्या साध्या कामांत व्यक्ती कशी हालचाल करतो हे पाहण्यात आले. यामध्ये २०१९ पर्यंत झालेल्या स्वयंसेवकाच्या मृत्यूची नोंदही करण्यात आली.7 / 10अभ्यासात असे आढळून आले की, शारीरिक कार्याची गती कमी झाल्याने लवकर मृ्त्यू होण्याची जोखम वाढली. तसेच जे स्वयंसेवक २०१९ पर्यंत मरण पावले, त्यांच्या मृत्यूपूर्वी १० वर्षांपर्यंत त्यांची खुर्चीवरून उठण्याची गती जिवंत असलेल्या लोकांपेक्षा खूप कमी होती.8 / 10अभ्यासात असे आढळून आले की, शारीरिक कार्याची गती कमी झाल्याने लवकर मृ्त्यू होण्याची जोखम वाढली. तसेच जे स्वयंसेवक २०१९ पर्यंत मरण पावले, त्यांच्या मृत्यूपूर्वी १० वर्षांपर्यंत त्यांची खुर्चीवरून उठण्याची गती जिवंत असलेल्या लोकांपेक्षा खूप कमी होती.9 / 10एवढेच नव्हे, तर मरण पावलेल्या स्वयंसेवकांना त्यांच्या ‘दैनंदिन कार्यात’ मृत्यूपूर्वी चार वर्षांपर्यंत जिवंत असलेल्या व्यक्तींपेक्षा जास्त शारिरीक अडचणी जाणवल्या. या काळात मरण पावलेल्या स्वयंसेवकांना अनेक शारीरिक अडचणी जाणवल्या. यात २२ टक्के लवकर मृत्यू झालेल्या स्वयंसेवकांची मृत्यूपूर्वी चालण्याची गती खूप मंद होती. तर १५ टक्के प्रकरणात ग्रिप स्ट्रेंथ आणि १४ टक्के प्रकरणांमध्ये खुर्चीवरून उठण्याची गती कमी झाली होती.10 / 10 त्याचवेळी, दैनंदिन जीवनातील अडचणींमुळे 30 टक्के स्वयंसेवकांना मृत्यू आढावला. यावर तज्ज्ञांना सांगितले की, हे मृत्यूची कारणे दिवसेंदिवस अधिक गंभीर बनत गेली आणि अनेकांचा मृत्यू झाला. आणखी वाचा Subscribe to Notifications