शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पेपर लिहिताना केलेला अभ्यास विसरता? जाणून घ्या यामागील शास्त्रीय कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: February 22, 2019 3:48 PM

1 / 8
शाळा आणि महाविद्यालयामध्ये सध्या परीक्षा सुरू आहेत. परीक्षा आली की सर्वच विद्यार्थी अभ्यास करायला सुरुवात करतात. मात्र परीक्षेच्या काळात अथवा अभ्यासासाठी पुस्तक हातात घेतल्यावर हमखास झोप येते. कधी कधी तर काही विद्यार्थी केलेला अभ्यासही विसरतात. मात्र असं होण्यामागे शास्त्रीय कारण आहे. हे कारण जाणून घेऊया
2 / 8
परीक्षेसाठी अनेक विद्यार्थ्यांनी खूप अभ्यास केलेला असतो पण पेपर लिहिताना प्रश्नांची उत्तरं आठवत नाहीत असं बऱ्याच वेळा होतं यालाच Mind Blank होणं म्हणतात. आपल्या मेंदूमध्ये तीन हिस्से असतात. त्यामध्ये आपण आतापर्यंत केलेल्या तसेच अनेक महत्त्वाच्या गोष्टी लक्षात ठेवतो. Hypothalamus हा पहिला भाग असून तो इमोशन्स आणि फिजिकल सेन्सेशनदरम्यान कार्यरत असतो.
3 / 8
एखाद्या गोष्टीमागे तर्क लावण्याचं महत्त्वाचं काम Hippocampus या दुसऱ्या भागात होतं. या भागामार्फत मेंदूला माहिती मिळते. तर मेंदूचा तिसरा भाग आहे Prefrontal Cortex हा डोळ्याच्या मागे असतो. यात निर्णय घेणं, एखाद्या गोष्टीची आठवण ही कामं सुरू असतात.
4 / 8
परिक्षेच्या दरम्यान विद्यार्थी अनेक गोष्टींचा विचार करत असतात. परीक्षेच्या काळात मेंदूच्या क्रियांना Cold Cognition म्हणतात. ज्यामध्ये प्रामुख्याने लॉजिकल आणि रॅशनल विचार असतात.
5 / 8
सर्व काही उत्तम सुरू असताना आपण खूप रिलॅक्स असतो. काही जणांना गाणी ऐकण्याची आवड असते अशा शांत वेळी Hypothalamus ची निर्मिती कमी वेगात होते आणि की स्ट्रेस हार्मोन रिलीज होतो.
6 / 8
परीक्षेच्या काळात अनेकदा अभ्यास न केलेले प्रश्न विचारले जातात त्याची उत्तरं येत नसल्याने काही विद्यार्थी अस्वस्थ होतात. कधीही विचार केला नसेल अशी परिस्थिती निर्माण होते त्याला Hot Cognition म्हणतात.
7 / 8
Hot Cognition म्हणजेच तणावाची परिस्थिती निर्माण होते. अशावेळी मेंदूला स्ट्रेस रिस्पॉन्स मिळतो, तेव्हा वर्किंग मेमरी बंद होते. यालाच Mind Blank असं म्हटलं जातं. प्रामुख्याने याच गोष्टीमुळे विद्यार्थ्यांना काही आठवत नाही तसेच झोप येते.
8 / 8
परिक्षेच्या काळात विद्यार्थी अभ्यास न झाल्यामुळे रात्रभर जागरण करतात. त्यामुळे शरीराला आवश्यक असलेली पुरेशी झोप त्यांना मिळत नाही. त्यामुळे पेपर लिहिताना त्यांना खूप झोप येते. परीक्षेच्या वेळी जास्त तणावानेही झोप येते.
टॅग्स :Healthआरोग्यEducationशिक्षणexamपरीक्षाStudentविद्यार्थी