शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी खास वेट लॉस ड्रिंक, मग बघा कमाल...

By ऑनलाइन लोकमत | Published: November 19, 2022 12:26 PM

1 / 8
Fat burning drinks: भारतात सध्या लग्नाचा सीझन सुरू झाला आहे. घरात लग्नाची तयारी खूप आधीपासून सुरू केली जाते. सगळेजण लग्नात त्यांच्या आवडीचे रंगीबेरंगी कपडे घालतात. सगळ्यांना वेगळं आणि चांगलं दिसायचं असतं. पण अनेकदा वाढलेल्या पोटामुळे कपडे बरोबर येत नाही. त्यामुळे आम्ही तुमच्यासाठी अशी वेट लॉस ड्रिंक घेऊन आलो आहोत, जे सकाळी प्यायल्यावर वजन कमी केलं जाऊ शकतं.
2 / 8
लवकर वजन कमी करण्यासाठी वेट लॉस ड्रिंक फार प्रभावी असतं. याने तुमच्या शरीरातून टॉक्सिन बाहेर निघतं आणि मेटाबॉल्जिम मजबूत होतं. ज्याद्वारे घरीच बेली फॅट म्हणजे बाहेर आलेलं पोट कमी केलं जाऊ शकतं. आयुर्वेदात वजन कमी करण्यासाठी ड्रिंकची रेसिपी दिली आहे.
3 / 8
कशापासून तयार कराल ड्रिंक - आयुर्वेदा डॉक्टर दीक्षा भवसार यांनी लवकर वजन कमी करणारं हे ड्रिंक तयार करण्यासाठी काही घरगुती पदार्थांची नावे सांगितली आहेत. 2 ग्लास पाणी, 7 ते 10 कढीपत्त्याची पाने, 3 ओव्याची पाने, 1 चमचा धणे, 1 छोटा चमचा जिरं,1 बारीक केलेली वेलची, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 इंच आल्याचा बारीक केलेला तुकडा.
4 / 8
आता एका मोठ्या भांड्यात पाणी टाका, त्यात लिंबाच्या रसासोबत सगळे पदार्थ टाका. आता हे पाणी 5 मिनिटे उकडू द्या. यानंतर पाणी गॅसवरून खाली उतरवा. यात लिंबाचा रस टाकून हे पाणी पिऊ शकता. हे लक्षात ठेवा की, एका दिवसात तुम्हाला हे पाणी केवळ 100 एमएल इतकंच सेवन करायचं आहे.
5 / 8
चहाऐवजी प्या वेट लॉस ड्रिंक - डॉ. दीक्षा भवसार यांनी सांगितलं की, लवकर वजन कमी करण्यासाठी तुम्ही सकाळी चहाऐवजी या ड्रिंकचं सेवन करावं. याने वजन कमी होण्यासोबत तुम्हाला अनेक फायदेही मिळतात. हिवाळ्यात वजन कमी करण्याची हा शानदार आयुर्वेदिक उपाय आहे.
6 / 8
हेयर फॉल आणि डायबिटीज होतो कमी - केसगळती रोखण्यासाठी सुद्धा या ड्रिंकचं सेवन केलं जाऊ शकतं. कारण यात कडीपत्त्याचा वापर केला जातो. ज्यामुळे केसगळती थांबते. ही पाने सोबतच ब्लड शुगरही मॅनेज करतात आणि हीमोग्लोबिन वाढतात.
7 / 8
धणे आणि जिरंही फायदेशीर - धण्याचे दाने आणि जिरंही पोटासाठी फार फायदेशीर असतात. याच्या सेवनाने खराब मेटाबॉलिज्म, माइग्रेनची समस्या, हॉर्मोनल इम्बॅन्स, थायरॉइड, अॅसिडीटी, कोलेस्ट्रॉल सारख्या समस्याही दूर होतात.
8 / 8
आलं आणि वेलची - प्राचीन काळापासून अनेक आजारांवर उपचार म्हणून आल्याचा वापर केला जातो. तेच वेलची खाण्यातून मोशन सिकनेस, मळमळ, हाई ब्लड प्रेशर, त्वचेची समस्या आणि केसांसाठी फायदेशीर ठरते.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य