Weight loss : time of the day when you burn the most calories api
प्रयत्न करूनही वजन कमी होत नाहीय? जाणून घ्या जास्त कॅलरी बर्न करण्याची योग्य वेळ.... By ऑनलाइन लोकमत | Published: March 21, 2020 9:26 AM1 / 14खाण्या-पिण्याच्या चुकीच्या सवयी आणि बदलत्या लाइफस्टाईलमुळे अनेकांना वजन वाढण्याची समस्या होत आहे. अशात अनेकजण वजन कमी करण्यासाठी वेगवेगळे उपाय करतात. एक्सरसाइज, डाएट करतात. पण तरी सुद्धा अनेक लोकांच्या वजनात काहीच फरक पडताना दिसत आहे. 2 / 14मुळात वजन कमी करणं हे फार आव्हानात्मक काम आहे. यात अनेकजण एका महत्वाच्या गोष्टीकडे दुर्लक्ष करतात. ती म्हणजे वजन कमी करण्याची वेळ. 3 / 14तुम्ही कोणत्या वेळी काय खाता, एक्सरसाइज कधी करता आणि शरीरासाठी कॅलरी बर्न करण्याची योग्य वेळ हे अनेकांना माहीत नसतं. या तिनही गोष्टी वजन कमी करण्यासाठी महत्वाच्या आहेत. 4 / 14प्रत्यक्षात आपलं शरीर आपल्या टायमिंगनुसार कॅलरी बर्न करत नाही. शरीराची कॅलरी बर्न करण्याची एक स्वत:चं टायमिंग असतं. चला जाणून घेऊ आपलं शरीर कधी जास्त आणि कधी सर्वात कमी कॅलरी बर्न करतं.5 / 14तज्ज्ञांनुसार, आपण दुपारी आणि सायंकाळी सर्वात जास्त कॅलरी बर्न करतो. तर सकाळी सर्वात कमी कॅलरी बर्न करतो. 6 / 14एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जास्तीत जास्त लोक सायंकाळी 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत जवळपास 10 टक्के अधिक कॅलरी बर्न करतात. 7 / 14आपलं शरीर या वेळेत प्रमाणापेक्षा जास्त कॅलरी बर्न करतं, मग आपण काहीही करो. याने काहीही फरक पडत नाही. कामानंतर घरी परत जात असाल किंवा कुठलं दुसरं काम करत असाल यावेळी आपलं शरीर एका खास प्रमाणात कॅलरी बर्न करतं.8 / 14यात समस्या तेव्हा होते जेव्हा आपण सर्वात कमी कॅलरी बर्न करतो. आपलं शरीर सकाळी 4 वाजेपासून ते 6 वाजेपर्यंत कमी कॅलरी बर्न करतं. असं यासाठी कारण आपल्या शरीराच्या कार्डिनल घड्याळानुसार ही वेळ आरामाची असते आणि शरीर या वेळेत पूर्णपणे आराम करण्याच्या मोडवर असतं. 9 / 14अशात जेव्हा शरीर पूर्णपणे आराम करत असतं तेव्हा कमीत कमी कॅलरी बर्न करतं. म्हणजे जे लोक सकाळी 4 ते 6 दरम्यान घाम गाळतात त्यांना जास्त फायदा मिळत नाही. 10 / 14तसेच यावेळी अनियमित शेड्यूलमुळे काही खात असाल तर तुमच्या शरीरातील जास्त कॅलरी बर्न होणार नाही. शरीर यावेळी कॅलरी साठवून ठेवण्याचा प्रयत्न करेल, ज्याने तुमचं वजन वाढू शकतं.11 / 14कॅलरी बर्न करण्यात वाढ होण्याचं मुख्य कारण शरीराची अंतर्गत घड्याळ हे आहे. जी कॅलरी बर्न करण्यात सर्वात जास्त मदत करते. तज्ज्ञांनुसार, सहजपणे वजन कमी करण्यासाठी दररोज बाहेरील जगासोबतच आपल्या अंतर्गत घड्याळासोबत जुळवून घेणं महत्वाचं असतं. 12 / 14हे दिवसा योग्य वेळेवर उन्हाच्या संपर्कात येण्याने आणि योग्य वेळी आहार घेऊन होतं. तसंच रात्री कमी खाऊन किंवा उपवास करूनही होतं.13 / 14आपण सगळेच सामान्यपणे दुपारी आणि सायंकाळी जास्तीत जास्त कॅलरी बर्न करत असतो. पण याचा अर्थ हा नाही की, तुम्ही कॅलरी बर्न करण्याच्या प्रक्रियेत या वेळेत एक्सरसाइज सुरू करावी.14 / 14यामुळे तुम्ही जेव्हावी एक्सरसाइज कराल तेव्हा आपल्या बॉडी क्लॉकसोबत शे्डयूल करा. ज्याने तुम्हाला एक्सरसाइजचा अधिक फायदा मिळेल. आणखी वाचा Subscribe to Notifications