Weight Loss Tips : try these burpee variations for weight loss
Weight Loss Tips : स्टेप बाय स्टेप करा Burpee Exercise By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2019 8:01 PM1 / 51. वजन घटवण्यासाठी फायदेशीर - दिवसभरात निरनिराळ्या पदार्थांच्या माध्यमातून आपल्या पोटात प्रचंड प्रमाणात कॅलरीज जातात. यामुळे अनावश्यक चरबी वाढू लागते. शरीरातील कॅलरीज बर्न व्हाव्यात, यासाठी Burpee Exercise करावा. या व्यायामामुळे आपले वजन घटण्यास मदत होते. 2 / 52. शारीरिक क्षमता वाढते - Burpee Exercise चा सर्वात चांगला फायदा म्हणजे यामुळे शारीरिक क्षमता वाढते. बर्पीमध्ये पुश-अप आणि स्क्वॉट केले जातात. यामुळे शरीर बळकट होण्यास मदत होते. यामध्ये केवळ पायांचाच नाही तर संपूर्ण शरीराचा व्यायाम होतो. 3 / 53. हृदयरोगासाठी बेस्ट व्यायाम - बर्पी व्यायाम प्रकारामुळे हृदय आणि किडनीचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. यामुळे हृदयविकार होण्याचा धोका कमी होतो. कमी कालावधीत बर्पी व्यायाम जास्तीतजास्त वेळा केल्यास तुमच्या एरोबिक एक्सरसाइजची क्षमताही वाढते. 4 / 54.स्नायूंची सहनशक्ती वाढते - 30 सेकंदांमध्ये जलदगतीनं 15वेळा बर्पी एक्सरसाइज केल्यास स्नायू बळकट होतात आणि त्यांची शक्ती वाढते. 5 / 55. तणाव दूर होतो - बर्पी एक्सरसाइजमुळे शरीरातून बाहेर पडणाऱ्या रसायनांना नैसर्गिक स्ट्रेस बूस्टरदेखील म्हटले जाते. हा एक्सरसाइज केल्यास तुमचे ताण-तणावाकडे लक्ष पूर्णतः दुर्लक्षित होते. यामुळे नैराश्यसारख्या आजारांपासून तुमचा बचाव होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications