weird heart attack symptoms you can find on your ears
सावधान! हार्ट अटॅक येण्याआधी कानामध्ये दिसतं 'हे' लक्षण; दुर्लक्ष करणं ठरेल जीवघेणं By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2022 2:48 PM1 / 10जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO) 2016 मध्ये हृदयासंबंधी रोगांमुळे (CVDs) जवळपास 17.9 मिलियन लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे, जे जगभरातील मृत्यूंपैकी 31% आहे. डब्ल्यूएचओचा (WHO) असं म्हणणं आहे की यापैकी 85% लोकांचा मृत्यू हा हार्ट अटॅक (heart attack) आणि हार्ट स्ट्रोकमुळे (heart stroke) होतो. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराची लक्षणे कोणती? हे जाणून घेऊया...2 / 10यूएस सेंटर्स फॉर डिसीज कंट्रोल अँड प्रिव्हेंशन (CDC) नुसार, हृदयविकाराच्या झटक्यामुळे छातीच्या मध्यभागी किंवा डाव्या बाजूला मोठा ताण किंवा कळ जाणवते जी काही मिनिटांपेक्षा जास्त काळ टिकते किंवा ती निघून जाते आणि परत येते. अस्वस्थपणामुळे तुम्हाला दबाव, जडपणा किंवा वेदना जाणवू शकतात. तुम्हाला अशक्तपणा, डोके दुखणे किंवा चक्कर आल्यासारखे वाटू शकते. 3 / 10अमेरिकन हार्ट असोसिएशन (AHA) सूचित करते की हार्ट अटॅकची लक्षणे पुरुष आणि स्त्रियांमध्ये वेगवेगळी असू शकतात. पुरुषांमध्ये सर्वात सामान्य लक्षण म्हणजे छातीत दुखणे किंवा अस्वस्थता, परंतु स्त्रियांमध्ये इतर सामान्य लक्षणे आहेत. हृदयविकाराची काही लक्षणे अशी देखील आहेत जी कानामध्ये दिसू शकतात.4 / 10हृदयविकाराच्या झटक्याचे एक विचित्र लक्षण तुमच्या कानात जाणवू शकते, ज्याला 'फ्रँक्स साइन' (Frank’s sign) म्हणतात. हे कानाच्या लोबमधील एक क्रीज आहे, जे लोब्यूलच्या पलीकडे ट्रॅगसपासून ऑरिकलच्या मागील काठापर्यंत पसरते. याचे नाव सँडर्स टी या फ्रेंक यांच्या नावावरून ठेवण्यात आले. हा तो व्यक्ती आहे जो छातीत दुखणे आणि कोरोनरी आर्टरी ब्लॉकेज असलेल्या रुग्णांमध्ये क्रीजचं निरीक्षण करणारा पहिला व्यक्ती होता. 5 / 10मेयो क्लिनिकच्या मते, 45 वर्षे व त्याहून अधिक वयाचे पुरुष आणि 55 वर्षे व त्याहून अधिक वयाच्या महिलांना हृदयविकाराचा धोका तरुण पुरुष आणि स्त्रियांपेक्षा जास्त असतो. याशिवाय उच्च रक्तदाब, कोलेस्टेरॉल, लठ्ठपणा, मधुमेह आणि मेटाबॉलिक सिंड्रोम यासारख्या परिस्थिती असलेल्या लोकांना हृदयविकाराचा धोका जास्त असतो.6 / 10तंबाखूचे सेवन, मद्यपान, बैठी जीवनशैली, ताणतणाव, उलट-सुलट गोष्टींचे सेवन आदींमुळेही हृदयविकाराचा धोका वाढू शकतो.हृदयविकाराचा धोका टाळण्याचा किंवा कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे निरोगी जीवनशैलीचा अवलंब करणे. हलके आणि चांगलं जेवण खाणे, नियमित व्यायाम करणे, स्ट्रेस कमी घेणे आणि संपूर्ण शरीराचे आरोग्य सांभाळल्याने हृदयविकाराचा धोका कमी होण्याची शक्यता वाढते.7 / 10तुम्ही कार्डिओपल्मोनरी रिसुसिटेशन (CPR) चा अवलंब करू शकता. हृदयविकाराचा झटका किंवा हृदयविकाराच्या झटक्याने पीडित व्यक्तीसाठी तातडीने करता येईल अशी सीपीआर ही आपत्कालीन प्रक्रिया आहे. ज्याच 120 च्या स्पीडने रूग्णाच्या ह्रद्यावर प्रेशर दिले जाते. ही प्रक्रिया रक्तप्रवाह सक्रिय ठेवण्यास, हृदयाला ब्लड पंप करण्यास, हृदयाची गती कमी असलेल्या व्यक्तीमधील श्वासोच्छवास आणि हृदयाचे ठोके पूर्ववत करण्यास मदत करते. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. टट8 / 10हृदय, डोळे आणि फुफ्फुसांनंतर कोरोना कानावर अटॅक करत असल्याची धडकी भरवणारी माहिती समोर आली आहे. कान दुखणे, ऐकण्याची क्षमता कमी होणे, कान जड होणे, घंटी किंवा शिटी वाजवल्यासारख्या आवाजाचा भास होणं अशा समस्या आता रुग्णांमध्ये आढळून येऊ लागल्या आहेत. त्यामुळे तज्ज्ञांच्या चिंतेत भर पडली आहे.9 / 10कोरोनामुळे रुग्णांना नीट झोप देखील लागत नाही. डॉक्टरांच्या मते हा कोरोनाचा नवा स्ट्रेन ड़ेल्टा व्हेरिएंट असू शकतो. रुग्णांमध्ये सेंसरी न्यूरल हियरिंग लॉस पाहायला मिळत आहे. व्हायरल इन्फेक्शनमुळे हा त्रास होतो. कोरोना व्हायरस नाकाच्या माध्यमातून इम्यून सिस्टमवर अटॅक करतो. नाक आणि कान हे कनेक्टेड असतात. जे इन्फेक्शन नाकात असतं ते पुढे कानात जातं. त्यामुळे व्हायरल इन्फेक्शनने रिएक्शन होतं. कान डॅमेज होऊ शकतो.10 / 10कोरोना व्हायरस कान आणि डोळ्यांवर थेट अटॅक करतो. नव्या स्ट्रेनमध्ये ताप येणं, पोट दुखणं, डायरिया, गॅस, उलटी, पाठदुखी, एसिडिटी, भूक न लागणं सारखी नवनवीन लक्षणं पाहायला मिळत आहेत. (टिप- ही माहिती आम्ही केवळ वाचक म्हणून आपल्यापर्यंत पोहोचवत आहोत. प्रत्येकाची शारीरिक स्थिती वेगळी असल्यानं कोणताही उपाय करण्यापूर्वी डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्यावा.) आणखी वाचा Subscribe to Notifications