शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

१०० आजारांचं एक औषध आवळा, नियमित खाल तर कधी औषध घ्यावं लागणार नाही!

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2020 10:09 AM

1 / 12
आवळा एक असं फळ आहे जे आपल्या औषधी गुणांसाठी फार प्रसिद्ध आहे. खासकरून महिलांच्या आरोग्यासाठी याने फार फायदे होतात. त्यामुळे आवळ्याचा नियमित आहारात समावेश करायला हवा. आवळ्यात व्हिटॅमिन सी, कॅल्शिअम, फॉस्फोरस, पोटॅशिअम, आयर्न, कॅरोटीन आणि व्हिटॅमिन बी भरपूर प्रमाणात असतं. हेच कारण आहे की, आवळ्याला १०० रोगांचं औषध मानलं जातं आणि म्हणूनच आवळ्याची तुलना अमृतासोबत केली जाते.
2 / 12
एक्सपर्ट सांगतात की, यात जराही शंका नाही की, आवळा एक वंडर फूड आहे. कारण या छोट्याशा फळात इतके गुण आहेत की, याने शरीराला वेगवेगळे फायदे मिळतात. आवळ्यातील खास गुण शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढवतात आणि सोबतच अनेक रोगांना मुळातून नष्ट करतात.
3 / 12
त्वचेवरील डाग - तज्ज्ञांनुसार चेहऱ्यावरील डाग दूर करण्यासाठी आवळा फारच फायदेशीर ठरतो. त्यासाठी याची पेस्ट तयार करून त्वचेवर लावा. याने त्वचा स्वच्छ आणि चमकदार दिसेल. तसेच याने त्वचेवरील सुरकुत्याही कमी होती.
4 / 12
काळे आणि दाट केस - केस काळे, दाट आणि चमकदार करण्यासाठीही आवळ्याचा वापर केला जातो. आवळ्याच्या पावडरने केस धुतल्याने किंवा नियमित आवळे खाल्ल्याने केसांची समस्या दूर होऊ शकते.
5 / 12
रक्ताची कमतरता होईल दूर - महिलांमध्ये रक्ताची कमतरता असेल तर दररोज आवळ्यांचा ज्यूस सेवन करणं फायदेशीर ठरतं. याने शरीरात रेड ब्लड सेल्स तयार होतात. त्यामुळे रक्ताची कमतरता होत नाही.
6 / 12
मासिक पाळीतील त्रास होईल दूर - आवळ्यातील मिनरल्स आणि व्हिटॅमिनमुळे मासिक पाळीवेळी होणारा त्रासही दूर केला जाऊ शकतो. कंबरदुखी, पोटदुखी, जास्त ब्लीडिंग या समस्या दूर होतील. अशात आवळा खाणं फार फायदेशीर ठरतं.
7 / 12
अॅंटी-ऑक्सिडेंट्स - आवळा आपल्या अॅंटी-ऑक्सिडेंट गुणांच्या माध्यमातून शरीरातील फ्री रॅडिकल्स कम करतं. फ्री रॅडिकल्सचा संबंध वय वाढण्याची लक्षणे, सुरकुत्या आणि त्वचेवर डाग यांच्याशी असतो.
8 / 12
पचनक्रिया सुधारते - अन्न पचनासाठी आवळा फार फायदेशीर आहे. याने पोटदुखी, आंबट ढेकर आणि गॅसची समस्या लगेच दूर होते. हेच कारण आहे की, कोणत्या ना कोणत्या स्वरूपात तुम्ही आहारात आवळ्याचा समावेश करावा. त्यासाठी आवळ्याची चटणी, मुरांबा, ज्यूस किंवा चुर्णाचं सेवन करा.
9 / 12
इम्यूनिटी वाढते - आवळ्यात बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनपासून लढण्याची क्षमता असते. त्यामुळे आवळा खाल्ल्याने इम्यूनिटी वाढते, ज्यामुळे आपण वेगवेगळ्या आजारांपासून बचाव करू शकतो. इतकेच नाही तर आवळा शरीरातून विषारी पदार्थही बाहेर काढतो.
10 / 12
डायबिटीसमध्ये फायदेशीर - आवळा डायबिटीसने ग्रस्त महिलांसाठी अमृतासारखाच आहे. कारण आवळ्यात क्रोमियम तत्व आढळतात जे इन्सुलिन हार्मोन्स मजबूत करून शुगर लेव्हल कंट्रोल करते. जर तुम्हाला डायबिटीस असेल तर आवळ्याच्या ज्यूसमध्ये मध मिश्रित करून सेवन करा.
11 / 12
हृदयासाठी फायदेशीर - आवळ्यातील क्रोमियम हृदयासाठीही फायदेशीर असतं. याने हृदय मजबूत आणि हेल्दी राहतं. इतकेच नाही तर आवळ्याने बॅड कोलेस्ट्रॉल नष्ट करून गुड कोलेस्ट्रॉल तयार केले जातात.
12 / 12
हाडे आणि डोळ्यांसाठी फायदेशीर - आवळे खाल्ल्याने हाडांना ताकद मिळते आणि ते मजबूत होतात. आवळ्यात भरपूर प्रमाणात कॅल्शिअम असतं. तसेच आवळ्याचा ज्यूस डोळ्यांसाठी फार चांगला मानला जातो. याने डोळ्यांची दृष्टी चांगली होते. ज्या लोकांना मोतीबिंदू, कलर ब्लाइंडनेस किंवा कमी दिसण्याची समस्या असेल तर त्यांनी आवळ्याचा रस सेवन करावा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य