शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

दूध सोडा, उंटाचे अश्रू पहा! एवढे अमुल्य की विचारही केला नसेल, अनेक देश 'चमत्कारा'च्या शोधात

By ऑनलाइन लोकमत | Published: March 18, 2023 4:04 PM

1 / 7
तुम्ही मगरीचे अश्रू ऐकला असाल, ही एक म्हण आहे. परंतू, उंटाचे अश्रू एवढा चमत्कार करू शकतील असे कधी ऐकले नसेल. उंटाचे दूध फायदेशीर असते, तसेच उंटाचे अश्रूदेखील खूप फायद्याचे आहेत. उंटाच्या दुधाला २५०० रुपये लीटरचा दर आहे, परंतू एक थेंब अश्रूला करोडो मोजायला कंपन्या तयार आहेत.
2 / 7
उंटाच्या अश्रूमध्ये सापाच्या विषावर उपचार करण्याची ताकद आहे. दुबईच्या केंद्रीय पशुवैद्यकीय संशोधन प्रयोगशाळेने हा दावा केला आहे.
3 / 7
उंटाच्या अश्रूमध्ये असलेल्या अँटीडॉट्सचा वापर सापाचे विष निष्प्रभ करण्यासाठी केला जाऊ शकतो. उंटाच्या अश्रूंवर भारत आणि अमेरिकेसह अनेक देशांमध्ये संशोधन सुरू आहे. जगातील सर्वात विषारी सापांचा दंशाचा रामबाण उपाय हा उंटाच्या अश्रूंमध्ये असतो, असे शास्त्रज्ञांचे म्हणणे आहे.
4 / 7
उंटाच्या अश्रूंमध्ये विविध प्रथिने आढळतात. ही प्रथिने संक्रमणापासून उंटाचे संरक्षण करतात. या अश्रूंमध्ये लाइसोझाइम्स असतात. हे व्हायरस, बॅक्टेरिया आणि कीटकांना प्रतिबंध करतात, असे संशोधनात आढळले आहे.
5 / 7
जगातील सर्वात विषारी साप आशिया आणि आफ्रिकेत आढळतात. उंटाचे अश्रू या विषावर उतारा तयार करण्यास मदत करू शकतात. लिव्हरपूल स्कूल ऑफ ट्रॉपिकल मेडिसिनमध्ये स्नेकबाईकवर संशोधन करणारे प्रोफेसर रॉबर्ट हॅरिसन यांनी ही माहिती दिली आहे. जगात फक्त 250 प्रकारचे विषारी साप आहेत, त्यावर उंटांचे अश्रूद्वारे औषध तयार केले जाऊ शकते, असे ते म्हणाले.
6 / 7
उंटाच्या अँटीबॉडीपासून सापाच्या विषाचे अँटी-व्हेनम बनवण्याचा आणखी एक मोठा फायदा आहे. कोणतेही विषरोधक सुरक्षित ठेवण्यासाठी कोल्ड-चेनची गरज असते. परंतू उंट हा प्राणी उष्णता सहन करण्याची अफाट शक्ती ठेवतो. हाच गुण जरअँटी व्हेनममध्ये आला तर ते साठवण्यासाठी कोल्ड-चेनची गरज भासणार नाही.
7 / 7
उंट हा प्रामुख्याने वाळवंटात आढळतो. वाळू डोळ्यात न जाण्यासाठी डोळ्यात एक विशेष संरक्षक यंत्रणा आहे. यामुळे उंटाच्या डोळ्यात संसर्ग होत नाही. उंटाच्या अश्रूंना 3 थर असतात. बाहेरील थर हा लिपीडचा बनलेला असतो. यामुळे डोळे कोरडे होत नाहीत. मधल्या थरात प्रथिने असतात. तर आतील थरात कर्बोदके असतात.
टॅग्स :snakeसाप