शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

फक्त 3 दिवस मोबाइल दूर ठेवा अन् चमत्कार पाहा; कसा ते समजून घ्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2025 18:32 IST

1 / 7
स्मार्टफोनच्या अतिवापरामुळे नैराश्यासोबतच अनेक समस्यांचा सामना करावा लागत असून, त्याचा मेंदूच्या आरोग्यावरदेखील विपरीत परिणाम होतो. मात्र, तुम्ही केवळ तीन दिवस स्मार्टफोनचा वापर केला नाही तर तुमच्या मेंदूचे आरोग्य सुधारत असल्याची बाब एका संशोधनातून समोर आली आहे.
2 / 7
७२ तास स्मार्टफोनपासून स्वतःला दूर ठेवल्यास मेंदूच्या रासायनिक विज्ञानावर सकारात्मक परिणाम होत असल्याचे या संशोधनात म्हटले आहे. 'कंप्युटर इन ह्यूमन बिहेवियर' नामक जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे.
3 / 7
युवकांच्या मेंदूत झालेल्या बदलाचा अभ्यास करण्यासाठी एफएमआरआय स्कॅन करण्यात आले. मेंदूतील बक्षीस (रिवॉर्ड) व मोह (केविंग) याच्याशी संबंधित भागात सकारात्मक बदल झाल्याचे आढळले.
4 / 7
७२ तास स्मार्टफोनचा वापर टाळला तर मेंदूतील व्यसनाच्या भावनेशी संबंधित भागात सकारात्मक बदल झाल्याचे संशोधनातून स्पष्ट झाले आहे. यासाठी १८ ते ३० वयोगटातील २५ युवकांची निवड करण्यात आली.
5 / 7
मोबाइलचा वापर टाळलेल्या या युवकांच्या मेंदूतील फंक्शनल मॅग्नेटिक रेजोनेन्स इमेजिंग (एफएमआरआय) स्कॅन केल्यानंतर त्यांची स्फार्टफोन पाहण्याची इच्छा कमी होण्यासोबत व्यसनाशी निगडित रसायनात बदल झाल्याचे आढळले.
6 / 7
मेंदूच्या आरोग्यासाठी छोटो-छोटे डिजिटल ब्रेकआवश्यक असल्याचे हीडलबर्ग व कोलोन विद्यापीठातील संशोधकांनी म्हटले आहे.
7 / 7
स्मार्टफोनचा वापर टाळल्यास डोपामिन व सेरोटोनिनसारख्या न्यूरोट्रान्समीटरच्या स्तरामध्ये महत्त्वाचा बदल होतो. व्यक्तीची मनस्थिती, भावना व सवयीवर या बदलांचा परिणाम होतो. त्यामुळे मेंदूतील रासायनिक प्रक्रियेचा व्यसनाशी संबंध असल्याची बाब या संशोधातून स्पष्ट झाली आहे.
टॅग्स :technologyतंत्रज्ञानMobileमोबाइलHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य