What is Office Cold ? lifestyle tricks to prevent office cold
काय आहे Office Cold?, जाणून घ्या या आजारापासून बचावाचे उपाय By ऑनलाइन लोकमत | Published: December 02, 2018 3:20 PM1 / 6ऑफिसमध्ये असताना तुम्हालाही खूप थंडी वाजते, सर्दी-खोकला होतो आणि ऑफिसमधून बाहेर पडल्यानंतर तुमची प्रकृती अगदी ठीकठाक असते. याचा अर्थ तुम्ही 'ऑफिस कोल्ड'पासून पीडित आहात. सर्दी-ताप-खोकला येणे हे संसर्गजन्य आजार आहेत. यामुळे ऑफिस कोल्डपासून बचाव करण्यासाठी खालील उपाय करावेत 2 / 61. योग्य प्रमाणात पाणी प्यावे : योग्य प्रमाणात पाण्याचे सेवन केल्यास या आजारामुळे होणारे डिहायड्रेशनचा त्रास होणार नाही. यामुळे शरीरातील पाण्याचा स्तरदेखील कायम टिकून राहील. 3 / 62. हात स्वच्छ ठेवा : कोणत्याही आजारांपासून वाचण्यासाठी सर्वात सोपा उपाय म्हणजे हात नियमित स्वच्छ धुणे. हात धुण्यासाठी किमान 20 सेकंदांचा वेळ द्यावा. यामुळे तुम्ही स्वतःचेच नाही तर इतरांचे आरोग्य जपत असता.4 / 63. छोटे-छोटे ब्रेक घ्या : 8 तासांच्या शिफ्टमध्ये छोटे-छोटे ब्रेक घेणे आवश्यक आहे. सलग आठ तास कोणताही ब्रेक न घेता काम करत राहिल्यास स्ट्रेस हॉर्मोन्स रिलीज होता. यामुळे शरीर कमकुवत होते आणि यामुळे सर्दी-खोकला लगेचच होऊ शकतो. संसर्गजन्य आजार होऊ नयेत यासाठी अधे-मधे ब्रेक घ्यावेत.5 / 64. कॉफीऐवजी ग्रीन टी प्या : सकाळी कॉफीऐवजी ग्रीन टी प्यावी. ग्रीन टी आरोग्याच्या दृष्टीनं फायदेशीर असते. कारण ग्रीन टीमध्ये अन्टिऑक्सिडेंट असतात. यामुळे रोगप्रतिकारक क्षमता वाढते शिवाय आजारांचा संसर्ग होण्याचा धोका कमी होतो.6 / 65.नियमित व्यायाम करा : केवळ वजन नियंत्रणात आणण्यासाठी व्यायाम करायचा नसतो. जर तुम्हाला धोकादायक संसर्गजन्य आजारांपासून बचाव करायचा असेल तर व्यायामाची बरीच मदत होते. व्यायामामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते शिवाय तुम्ही निरोगीदेखील राहता. आणखी वाचा Subscribe to Notifications