शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

White Hair: लग्नाआधीच पांढरे झालेत केस? हे आयुर्वेदिक उपाय करून काळे अन् चमकदार होतील केस

By ऑनलाइन लोकमत | Published: June 20, 2022 4:02 PM

1 / 8
White Hair Problem Solution: सुंदर केस तर सर्वांनाच हवे असतात. पण सद्याच्या काळात अनहेल्दी लाइफस्टाईलमुळे, प्रदूषणामुळे आणि केसांना पूर्ण पोषण मिळत नसल्याने ते वेळेआधीच पांढरे होतात. कमी वयातच केस पांढरे होणे ही एक चिंतेची बाब आहे. आजकाल ही समस्या जास्त बघायला मिळते. अनेक महिला आणि पुरूषांचं पांढऱ्या केसांमुळे लग्नही जुळत नाही.
2 / 8
कमी वयात का पांढरे होतात केस? - कमी वयात केस पांढरे होण्याचं कारण मेलेनिनची कमतरता आहे. याचं दुसरं कारण आहे संतुलित आहाराची कमतरता, ज्यामुळे शरीराला आणि केसांना पूर्ण पोषण मिळत नाही. आपल्या शरीरात अनेक अशा कोशिका असतात ज्या एकत्र मिळून काम करतात आणि त्यामुळे केस काळे राहतात. पण या कोशिकांना योग्य ते पोषण मिळालं नाही तर त्या योग्यप्रकारे कामही करत नाहीत. याच कारणाने केस पांढरे होऊ लागतात.
3 / 8
औषधांचे होतात साइड इफेक्ट्स - पांढरे झालेल्या केसांसाठी मार्केटमधून औषध घेणं किंवा एखाद्या डॉक्टरकडून ट्रीटमेंट घेणं सोपं काम आहे. पण सोबतच याचे साइड इफेक्ट्सही भरपूर बघायला मिळतात. अशात बरं होईल की, तुम्ही काही नॅच्युरल ट्रीटमेंट घ्या. म्हणजे काही आयुर्वेदिक उपचारांचा आधार घ्या. या आयुर्वेदिक उपायांनी तुमचे पांढरे केस काळे होतील.
4 / 8
काय टाळावं? - केस पांढरे होण्याचं पहिलं कारण आहे हेरेडिटरी, दुसरी कारण आहे टेंशनमध्ये राहणं, तिसरं कारण आहे फार जास्त विचार करणं, चौथं कारण आहे दारूचं अधिक सेवन आणि पाचवं कारण आहे उष्ण असलेल्या पदार्थांचं अधिक सेवन करणं. अशात आयुर्वेदिक उपचार तुम्हाला फायदेशीर ठरू शकतो.
5 / 8
आवळ्याचा ज्यूस सर्वात फायदेशीर - केस काळे करण्यात आवळ्याची महत्वाची भूमिका मानली जाते. जर तुम्ही नियमितपणे आवळ्याचा ज्यूस पित असाल तर याने केसांना लवकर पोषण मिळतं. जर एक महिना तुम्ही आवळ्याचा ज्यूस घेतला तर तुम्हाला लवकरच याचा चांगला प्रभाव केसांवर बघायला मिळेल.
6 / 8
कढीपत्त्याच्या ज्यूसचं सेवन - केस काळे करण्यासाठी कढीपत्त्याच्या वापराचाही फायदा होतो. रोज कढीपत्त्याचा ज्यूस घेतला तर तुमच्या शरीराला आणि केसांना पोषण मिळेल. केसांवर याचा चांगला प्रभाव लवकर बघायला मिळेल. याचा फायदा तेव्हाच मिळेल जेव्हा तुम्ही ज्यूसचं सेवन नियमित कराल. याचा ज्यूस बनवण्यासाठी शंभर एमएल पाण्यात 10 ते 15 कढीपत्त्याची पाने टाकून उकडून घ्या. पाणी अर्ध झालं की, ते थंड होऊ द्या आणि नंतर गाळून प्या.
7 / 8
खोबऱ्याच्या तेलासोबत कढीपत्ता लावा - खोबऱ्याच्या तेलात कढीपत्ता मिक्स करून लावल्याने केसांना फार फायदा होतो. कढीपत्ता आणि खोबऱ्याचं तेल मिश्रित करून लावल्याने केस निरोगी आणि चमकदार दिसतात. याचा वापर करण्यासाठी खोबऱ्याच्या तेलात काही कढीपत्त्याची पाने टाकून उकडून घ्या. कोमट तेलाने डोक्याची मसाज करा.
8 / 8
आवळ्याचं पावडर - आवळ्याच्या पावडरचं नियमितपणे एका निश्चित प्रमाणात सेवन केलं तर तुमचं शरीर आणि केसांच्या कोशिकांना पोषण मिळतं. यासाठी पाण्यात थोडे कढीपत्त्याची पाने टाकून उकडून घ्या. पाणी अर्ध झालं की, त्यात आवळ्याचं पावडर टाका. हे पाणी कोमट झालं की सेवन करा. याने केसांना पोषण मिळेल.
टॅग्स :Hair Care Tipsकेसांची काळजीHealth Tipsहेल्थ टिप्स