Who can have a heart attack? AI will tell, findings from database study
कोणाला येऊ शकतो हार्ट अटॅक? एआय सांगणार, डेटाबेसच्या अभ्यासातील निष्कर्ष By ऑनलाइन लोकमत | Published: November 09, 2023 12:51 PM1 / 8लंडन : गेल्या काही वर्षांत हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण वाढलेले असतानाच आता एआयच्या मदतीने हार्ट अटॅक रोखता येणार आहेत.2 / 8हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता ९० टक्क्यांहून अधिक असलेल्या व्यक्तींना एआयच्या मदतीने शोधता येणार आहे.3 / 8पॅरिस कार्डिओव्हॅस्क्युलर रिसर्च सेंटरचे प्रोफेसर झेवियर जॅवेन यांनी माहिती दिली आहे.4 / 8जॅवेन म्हणाले की, संशोधनादरम्यान एआयच्या मदतीने हार्ट अटॅकने मृत्यू झालेल्या २५,००० लोकांच्या डेटाबेसचा अभ्यास करण्यात आला. 5 / 8त्यानंतर ही माहिती ७०,००० सामान्य व्यक्तींच्या डेटाबेसशी जोडण्यात आली. 6 / 8यातून २५,००० अशी समीकरण तयार करण्यात आली, ज्याचा उपयोग हार्ट अटॅकने मृत्यू होण्याची शक्यता असलेल्या लोकांना ओळखण्यासाठी केला जाऊ शकतो.7 / 8जगातील एकूण मृत्यूंपैकी २० टक्के मृत्यू हे हार्ट अटॅकने होतात. हार्ट अटॅकचा अंदाज लावणे कठीण आहे. 8 / 8दरम्यान, या संशोधनातील विश्लेषणाच्या मदतीने हार्ट अटॅकचा धोका कमी होईल. आणखी वाचा Subscribe to Notifications