शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रशियानं तयार केली जगातील पहिली कोरोनाची लस; त्यावर WHO चे तज्ज्ञ म्हणाले की.....

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2020 4:55 PM

1 / 10
रशियाचे राष्ट्रपती व्लादिमीर पुतिन यांनी केलेल्या दाव्यामुळे संपूर्ण जग चकित झालं आहे. जगभरातील लोक कोरोना लसीच्या प्रतिक्षेत असताना रशियाने कोरोना विषाणूंची लस यशस्वीरित्या तयार केल्याचा दावा केला आहे. रशियात ऑक्टोबर महिन्यापासून कोरोना लसीच्या उत्पादनाला सुरुवात होईल. रशियाच्या आरोग्यमंत्रालयानंही लसीसाठी मंजूरी दिली आहे. व्लादिमीर पुतिन यांनी आपल्या मुलीला कोरोनाची लस दिल्याचे सांगितले आहे.
2 / 10
ही लस गामलेया इंस्टिट्यूटने विकसित केलेली आहे. पुतिन यांनी दिलेल्या माहितीनुसार रशियात लवकरता लवकर ही लस उपलब्ध होणार आहे. फिलीपींसच्या राष्ट्रपतींही कोरोनाच्या लसीवर विश्वास दाखवला आहे. कोरोना लसीच्या चाचणीत सहभागी होण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली आहे.
3 / 10
रशियानं दिलेल्या माहितीनुसार या लसीच्या उत्पादनासोबतच लसीच्या तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू असणार आहे. रशियातील लस तयार झाल्यामुळे उत्साहाचं वातावरण पसरलं आहे. तर जागतिक आरोग्य संघटनेनं या लसीबाबत संशय व्यक्त केला आहे
4 / 10
WHO नं रशियाला लस उत्पादन करण्यासाठी गाईडलाईन्सचं पालन करण्यास सांगितले आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ता क्रिस्टियन लिंडमियर यांनी यूएन प्रेस ब्रीफिंग दरम्यान सवाल उपस्थित केला होता. त्यांनी सांगितले की जर कोणत्याही लसीची शेवटची चाचणी पूर्ण करण्याआधी लसीचे उत्पादन करण्याची परवानगी दिली जात असेल तर ही बाब धोकादायक ठरू शकते.
5 / 10
रशियाच्या आरोग्य मंत्र्यांनी शनिवारी दिलेल्या माहितीनुसार ऑक्टोबरमध्ये या लसीचे उत्पादन मोठ्या प्रमाणावर केलं जाणार आहे. लस तयार झाल्यानंतर लसीकरणासाठी आरोग्य कर्मचारीवर्गाला प्राथमिकता देण्यात येणार आहे. त्यानंतर अन्य नागरिकांसाठी लस उपलब्ध होईल.
6 / 10
वरिष्ठ नागरिक आणि आरोग्य सेवेतील कामगारांना लस सगळ्यात आधी देण्यात येणार आहे. तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार चाचणीदरम्यान या लसीचे सकारत्मक परिणाम दिसून आले आहेत. उत्पादनासोबत शेवटच्या टप्प्यातील चाचणी सुद्धा सुरू राहणार आहे.
7 / 10
जागतिक आरोग्य संघटनेचे प्रवक्ता क्रिस्टियन लिंडमिअर यांनी सांगितले की, जेव्हाही अशी माहिती समोर येते तेव्हा आपल्याला अधिक सावधगिरी बाळगण्याची गरज असते. अनेकदा शास्त्रज्ञांकडून लस तयार करण्याचा दावा केला जातो. पण प्रयत्यक्षातील लसीच्या सगळ्या चाचण्या यशस्वी होणं आणि दावा करणं यात फरक आहे.
8 / 10
पुढे त्यांनी सांगितले की, सुरक्षित कोरोना लस तयार करण्यासाठी काही गाईडलाईन्स तयार करण्यात आल्या आहेत. या नियमांचं आणि गाईडलाईन्सचं पालन करणं गरजेचं आहे. तेव्हाच व्हायरसशी लढण्यासाठी लस किती परिणामकारक आहे याबाबत माहिती मिळू शकेल.
9 / 10
गाईड लाईन्सचं पालन केल्यामुळे लसीचे कोणते साईट इफेक्ट्स आहेत का याबाबतही माहिती मिळवता येऊ शकते. जागतिक आरोग्य संघटनेन आपल्या वेबसाईटवर वैद्यकिय परिक्षणात असलेल्या २५ लसींची यादी नमुद केली आहे. १३९ लसी अजूनही प्री क्लिनिकल ट्रायलच्या टप्प्यात आहे. शेवटच्या ट्प्पायातील लसींमध्ये रशियाच्या लसीचा उल्लेख करण्यात आलेला नाही. ब्रिटेनची ऑक्सफोर्ड, अमेरिकेतील मॉडर्ना, चीनची सिनोवॅक या लसींचा समावेश आहे.
10 / 10
जागतिक आरोग्य संघटनेनं लस निर्मीतीच्या प्रक्रियेत घाई न करण्याचा सल्ला दिला आहे. कारण यामुळे लोकांच्या आरोग्याचं नुकसान होण्याची शक्यता आहे. अनेक देश लवकरात लवकर लस तयार करण्याच्या प्रयत्नात आहेत.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCoronaVirus Positive Newsकोरोना सकारात्मक बातम्याrussiaरशियाWorld health organisationजागतिक आरोग्य संघटनाHealthआरोग्य