शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Air Pollution Death Rate: WHOचा दावा! एका मिनिटाला १३ मृत्यू; आपणच निर्माण केला कोरोनापेक्षाही भयानक आजार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 11, 2022 12:58 PM

1 / 9
कोरोनाच्या वेगवेगळ्या व्हेरिअंटनी जगाला वेठीस धरले आहे. आज हा व्हेरिअंट सापडला, उद्या तो, असे करता करता दोन वर्षे उलटून गेली आहेत. जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने त्यातच एक त्रस्त करणारी माहिती सांगितली आहे. कोरोना पेक्षाही भयंकर आजाराची.
2 / 9
जगभरात वायू प्रदूषणामुळे निर्माण होणाऱ्या आजारांनी दर मिनिटाला १३ लोकांचा मृत्यू होत आहे. परंतू, त्याकडे महामारी म्हणून नाही तर विकास म्हणून आपण या प्रश्नाकडे पाहत आहोत.
3 / 9
डब्ल्यूएचओने ट्विटरवर एक पोस्ट केली आहे, त्यात जगभरात वायू प्रदूषण वाढत असल्याने फुफ्फुसाचा कर्करोग, हृदयविकार आणि पक्षाघात यासारखे गंभीर आजारांचा धोका वाढत असल्याचे म्हटले आहे. यामुळे दर मिनिटाला कमीतकमी १३ लोक आपले प्राण गमवत आहेत.
4 / 9
तेल, कोळसा आणि नैसर्गिक वायू यांसारख्या जीवाश्म इंधनांच्या जाळण्यामुळे वायू प्रदूषण होते आणि ते तातडीने थांबवण्याची गरज असल्याचा इशारा संघटनेने दिला आहे. जर आपल्याला निरोगी आयुष्य जगायचे असेल तर जीवाश्म इंधन हे जमिनीतच ठेवण्याचे आवाहन केले आहे.
5 / 9
हवा प्रदूषण हे जगातील मृत्यूंचे प्रमुख कारण आहे. बाहेरील आणि घरातील हवा प्रदूषणामुळे दरवर्षी 7 दशलक्षांहून अधिक लोकांचा मृत्यू होतो, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे. गावांपेक्षा शहरांमध्ये हा धोका अधिक आहे.
6 / 9
दरवर्षी लाखो लोकांचा वयाआधीच मृत्यू होत आहे. यासाठी हृदयविकार, क्रॉनिक ऑब्स्ट्रक्टिव्ह पल्मोनरी डिसीज, फुफ्फुसाचा कर्करोग, तीव्र श्वसन संक्रमण, पक्षाघात आदी कारणीभूत ठरतात.
7 / 9
धक्कादायक बाब म्हणजे, जगातील 91% लोकसंख्या ही वाईट प्रदूषण पातळीच्या भागात राहते. हे देश विकसनशील आहेत. कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये हे लोक राहतात, असे डब्ल्यूएचओने म्हटले आहे.
8 / 9
शहरात राहणाऱ्या नागरिकांना हवा प्रदूषणाचा त्रास अधिक असतो. यामुळे शहरी भागातील दरवर्षी 4.2 दशलक्ष लोकांचा मृत्यू होतो. घरातील हवा प्रदूषण देखील मृत्यूसाठी जबाबदार आहे. स्वयंपाकाच्या आगीतून निघणाऱ्या धुरामुळे दरवर्षी ३.८ दशलक्ष अकाली मृत्यू होतात. हे मृत्यू कमी आणि मध्यम उत्पन्न असलेल्या देशांमध्ये सर्वाधिक होतात.
9 / 9
कोरोना व्हायरसमध्ये आपल्याला आपले फुफ्फुस किती कमजोर आहे आणि ते कशासाठी तंदुरुस्त ठेवावे याचा अनुभव आला. कोरोना हा श्वास आणि फुफ्फुसाशी जोडलेला आजार होता. ज्याला झाला त्याचे फुफ्फुस जर कमजोर असेल तर त्याला कोरोनाशी झुंजावे लागले होते. यामुळे पुढील रोगांपासून वाचण्यासाठी हवा प्रदूषण हे कमी करावेच लागणार आहे.
टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याair pollutionवायू प्रदूषण