शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मंकीपॉक्स व्हायरसचे नाव बदलून ठेवले जाणार एमपॉक्स? WHO घेणार लवकरच निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Published: November 23, 2022 12:39 PM

1 / 9
जगभरात मंकीपॉक्स व्हायरसच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे. दरम्यान, जागतिक आरोग्य संघटना (WHO) या व्हायरसचे नाव बदलण्याचा विचार करत आहे. यूएस वृत्तपत्राच्या रिपोर्टनुसार, जागतिक आरोग्य संघटना मंकीपॉक्सचे नाव एमपॉक्स ठेवणार आहे.
2 / 9
व्हायरसचे नाव बदलण्यासाठी अमेरिकन प्रशासनाकडून सातत्याने आवाहन केल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनाने हा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत जगभरात मंकीपॉक्सच्या रुग्णांमध्ये घट झाली आहे, परंतु मे महिन्याच्या सुरुवातीला अमेरिका आणि युरोपमध्ये या व्हायरसची प्रकरणे झपाट्याने वाढत होती. मंकीपॉक्सला अमेरिकेतही जागतिक आरोग्य आणीबाणी घोषित करण्यात आली होती.
3 / 9
अमेरिकेत या व्हायरसची 30 हजारांहून अधिक प्रकरणे नोंदली गेली आहेत. हा व्हायरस आफ्रिकेतून पसरला होता. एंडेमिक भागातही मंकीपॉक्सच्या हजारो रुग्णांची नोंद होण्याची ही पहिलीच वेळ होती. या व्हायरसची प्रकरणे भारतातही नोंदवली गेली होती. मात्र, मंकीपॉक्स देशात पसरला नाही. भारतात मंकीपॉक्सची 20 पेक्षा कमी प्रकरणे समोर आली होती.
4 / 9
आपल्या प्रोटोकॉलनुसार, जागतिक आरोग्य संघटना कोणत्याही रोगाचे नाव हे त्या क्षेत्राशी संबंधित ठेवते. दरम्यान, अनेक वेळा असे केल्याने त्या क्षेत्राच्या प्रतिष्ठेवरही परिणाम होतो. मंकीपॉक्स व्हायरस माकडांद्वारे पसरला होता आणि त्याचा उगम आफ्रिकेत झाला होता.
5 / 9
अशा परिस्थितीत आता त्याचे नाव बदलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोणत्याही सांस्कृतिक किंवा जातीय समूहांचा अपमान होऊ नये हा नाव बदलण्याचा उद्देश आहे. मंकीपॉक्सची वाढती प्रकरणे पाहता जागतिक आरोग्य संघटनेने जुलैमध्ये राष्ट्रीय आरोग्य आणीबाणी घोषित केली होती.
6 / 9
मंकीपॉक्स हा अतिशय दुर्मिळ आजार आहे. देवीचा रोग ज्या व्हायरसमुळे होतो त्याच व्हायरसचा हा एकप्रकारे उपप्रकार आहे, असे म्हणायला हरकत नाही. संसर्ग झालेल्या रुग्णाशी जवळचा संबंध आल्यास हा रोग वेगाने पसरतो. हा व्हायरसचा त्वचा, श्वसनलिका, डोळे, नाक किंवा श्वसनावाटे संसर्ग होऊ शकतो.
7 / 9
सुरुवातीच्या लक्षणांमध्ये ताप, डोकेदुखी, सूज, पाठदुखी, स्नायूंमध्ये वेदना आणि अस्वस्थपणा यांचा समावेश होते. लागण झाल्यानंतर शरीरावर पुरळ येतात. रुग्ण बरा झाल्यानंतरही शरिरावर हे डाग तसेच राहतात.
8 / 9
प्राण्यांना जर हा आजार झाला असेल आणि त्यांच्याशी थेट संबंध आला तर माणसाच्या शरिरात हा व्हायरस प्रवेश करु शकतो. तसेच, रुग्णांचे वापरलेले कपडे किंवा रुग्णांशी थेट संबंध आल्यानंही या रोगाची लागण होऊ शकते. व्यक्तीला लागण झाल्यानंतर 21 दिवसांच्या आत लक्षणे दिसतात.
9 / 9
सध्या या आजारावर कोणताही उपचार उपलब्ध नाही. परंतु हा आजार रोखण्यासाठी स्मॉल पॉक्स वॅक्सिन, अँटीव्हायरल आणि व्हीआयजी यांचा वापर केला जाऊ शकतो. दरम्यान, स्‍माल पॉक्‍स लस मंकीपॉक्‍स रोखण्‍यासाठी 85 टक्के प्रभावी ठरली आहे. मंकीपॉक्सवर अद्याप कोणताही सुरक्षित आणि सिद्ध उपचार नाही.
टॅग्स :Healthआरोग्यHealth Tipsहेल्थ टिप्स