WHO Warns of Pandemic’s Indirect Dangers to Women and Children
चिंताजनक! कोरोना महामारीमध्ये आणखी एका महामारीचा धोका, WHO कडून भीषण नुकसानाचा इशारा By ऑनलाइन लोकमत | Published: June 13, 2020 12:36 PM1 / 7WHO कडून सांगण्यात आले आहे की, कोरोना व्हायरस महामारीचा अप्रत्यक्ष प्रभाव सर्वात जास्त महिला, लहान मुले आणि तरूणांवर पडू शकतो. 2 / 7WHO चे प्रमुख टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, कोरोनाच्या अप्रत्यक्ष प्रभावामुळे या खास समुहावर जो वाईट प्रभाव पडेल, तो कोविड-19 व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूंपेक्षाही भयावह असू शकतो.3 / 7टेड्रोस एडहॅनम घेब्रियेसुस म्हणाले की, अनेक ठिकाणी महामारीमुळे हेल्थ सिस्टीमवर दबाव वाढला आहे. त्यामुळे प्रेग्नन्सी आणि डिलिव्हरीशी संबंधित समस्यांमुळे महिलांच्या मृत्युचा धोका वाढू शकतो.4 / 7यूनायटेड नेशन्स पाप्युलेशन फंडच्या एग्झिक्युटीव्ह डायरेक्टर नतालिया कनेम यांवर सांगितले की, 'महामारीच्या आता आणखी एक महामारी निर्माण झाली आहे.5 / 7नतालिया कनेम म्हणाल्या की, एका अंदाजानुसार, दर 6 महिन्याच्या लॉकडाऊनमुळे 4.7 कोटी महिला कंट्रोसेप्शन सुविधा गमावतील. त्यामुळे 6 महिन्याच्या लॉकडाऊनमध्ये इच्छा नसतानाही 70 लाख बाळांचा जन्म होईल.6 / 7इंटर पार्लियामेंट्री यूनियनचे प्रेसिडेन्ट ग्रॅब्रिएला कुवस बॅरन म्हणाले की, महामारीमुळे 4 ते 6 कोटी बालकांवर भीषण गरीबीचा धोका निर्माण झालाय. जगातल्या अनेक देशांमध्ये महामारीमुळे शाळा अनेक महिने बंद आहेत. (Image Credit : forbes.com)7 / 7जगात आतापर्यंत कोरोना व्हायरसचे 76.5 लाखपेक्षा अधिक केसेस समोर आल्या आहेत. तर 4.25 लाख लोकांना आपला जीव गमवाव लागला आहे. अशात ही नवीन माहिती चिंता वाढवणारी आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications