शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

Gudi Padwa 2018: गुढीपाडव्याला कडुनिंब का खातात ?

By ऑनलाइन लोकमत | Published: March 17, 2018 5:36 PM

1 / 6
चैत्र शुद्ध प्रतिपदा म्हणजे गुढीपाडवा. गुढीपाडव्यामुळे नववर्षाची सुरुवात प्रसन्न वातावरणात, जल्लोषात होते. चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आंध्र प्रदेश, कर्नाटक ह्या राज्यांमध्ये उगादी, चेटी चांद अशा वेगवेगळ्या नावांनी आणि पद्धतींनी साजरा केला जातो. पण पाडव्याला असो वा उगादीला कडुनिंबचा समावेश या प्रत्येक राज्यातील पदार्थांमध्ये असतोच. म्हणून जाणून घेऊया पाडव्याला कडुनिंबाचं काय असतं महत्व.
2 / 6
गुढीपाडव्यादिवशी कडुनिंब का खावं? होळीनंतर वातावरणात बदल होते व उष्णता वाढायला सुरूवात होते. या बदलत्या वातावरणामुळे कांजण्या, गोवर असे विविध आजार पसरू लागतात. त्यामुळे उत्तम आरोग्य राखण्यासाठी व शरीराचे स्वाथ्य राखण्यासाठी नववर्षाची सुरूवात कडुनिंबाच्या सेवनाने करतात.
3 / 6
कडुनिंबाचे औषधी गुणधर्म - १) कडुनिंबातील विविध 'प्रोटिन’ घटकांमुळे कर्करोगासारख्या आजारांपासून बचाव होतो
4 / 6
२) कडुनिंबातील अ‍ॅन्टीबॅक्टेरियल व अ‍ॅन्टीफंगल गुणधर्मांमुळे त्वचेचे विकार व जंतूसंसर्गापासून बचाव होतो.
5 / 6
३) अपचन, पित्त, गॅसेस सारख्या समस्यांमध्ये कडुनिंब गुणकारी आहे तसंच केसांच्याही समस्या दूर करण्यासाठी कडुनिंब मदत करतं
6 / 6
४) मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना कडुनिंबाच्या सेवनामुळे रक्तातील साखर व इन्सुलिनचे प्रमाण समतोल राखण्यास मदत होते.
टॅग्स :Gudi Padwa 2018गुढीपाडवा २०१८gudhi padwaगुढी पाडवाHealth Tipsहेल्थ टिप्स