Why does some people feel cold more and some less Know about the scientific reason behind it
थंडी कुणाला अधिक तर कुणाला कमी का जाणवते? जाणून घ्या, काय आहे यामागचं वैज्ञानिक कारण By ऑनलाइन लोकमत | Published: December 28, 2022 2:41 PM1 / 9सध्या देशभरात काँग्रेसची भारत जोडो यात्रा सुरू आहे. या यात्रेबरोबरच चर्चा सुरू आहे, ती काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या टी-शर्टची. कडाक्याच्या थंडीत सुरू असलेल्या या यात्रेत राहुल गांधी केवळ टी-शर्टवर फीरत आहेत. एवढ्या थंडीतही ते केवळ टी शर्टवरच कसे फिरत आहेत? त्यांना थंडी का जाणवत नाही? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पण तुम्हाला माहीत आहे का, की थंडी का वाजते? कुणाला अधिक तर कुणाला कमी का जाणवते? तर वैज्ञानिक पद्धतीने जाणून घेऊयात सर्व प्रश्नांची उत्तरं...2 / 9आपल्याला थंडी का जाणवते? - सर्वात मोठा प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीला थंडी का जाणवते? तर आपल्या शरीरात स्किनखाली थर्मो-रिसेप्टर नर्व्ह्स (Thermo-receptors Nerves) असते. जी आपल्या डोक्याला थंडी वाजत असल्याचा मेसेज पाठवते. यानंतर, डोक्यातील हायपोथॅलेमस (Hypothalamus) आपल्या शरीरातील उष्णता संतुलित करू लागतो. यामुळेच शरीरावर शहाराही येतो आणि स्नायू आकुंचित होऊ लागतात. यामुळेच कुणालाही थंडी जाणवते. 3 / 9थंडी कुणाला अधिक तर कुणाला कमी का जाणवते? - अध्ययनानुसार, कमी अथवा अधिक थंडी जाणवणे हे पूर्णपणे लिंग, वय आणि जिन्सवर अवलंबून असते. यावरूनच, एखाद्या व्यक्तीला किती थंडी जाणवते, हे निश्चित होते. तापमान सहन करण्याची आणि थंडी जाणवण्याची क्षमता प्रत्येकाची वेगळी असते. 4 / 9याशिवाय, वृद्धांना थंडी कमी तर तरुणांना अधिक का जाणवते? संशोधनात सांगण्यात आले आहे, की तापमान जोवर फार कमी होत नाही. तोवर वद्धांना थंडी वाजत नाही. या तुलनेत, तापमान थोडे कमी झले, तरी तरुणांना हुडहडी भरते. कारण, वृद्धांच्या तुलनेत तरुणांमध्ये थंडी जाणवण्याची क्षमता अधिक असते. हे वयाप्रमाणे हळू हळू कमी होत जाते.5 / 9थंडी वाजताच थरथरायला का होतं? वातावरणातील तापमान कमी झाल्यानंतर, डोक्यातील हायपोथॅलेमस (Hypothalamus) बॉडी टेम्परेचर बॅलेन्स करायला लागते आणि बॉडी पार्ट्स हळूवार काम करायला लागतात. यामुळे शरीरात अधिक मेटॅबॉलिक हीट (Metabolic Heat) तयार व्हायरला सुरुवात होते आणि शरीर थरथरायला लागते. 6 / 9शरीर थरथरायला लागते, म्हणजेच आपले शरीर शरीरातील आणि बेहेरील तापमान संतुलित करायला सुरुवात झाली आहे. यानंतर, जेव्हा तापमान संतुलित होते, तेव्हा शरीराचे थरथरणेही कमी होते.7 / 9या कारणांमुळे अधिक जाणवते थंडी - अधिक थंडी जाणवण्याची अनेक कारणे असू शकतात. यात, उंचीच्या प्रमाणात शरीराचे वजन अधिक कमी असल्यास थंडी अधिक जाणवते. याशिवाय, शरीरात लोहाची कमतरता आणि थायरॉईड बिघडल्याने थंडी अधिक जाणवू शकते. शरीराच्या सर्व भागांमध्ये योग्य रक्ताभिसरण न झाल्यानेही तीव्र थंडी जाणवू शकते. याच बरोबर, योग्य झोप न लागणे, डिहायड्रेशन आणि व्हिटॅमिन बीची कमतरता, यामुळेही थंडी जानवते.8 / 9अधिक थंडी असलेल्या भागांत राहणाऱ्या व्यक्तींचे शरीर त्यानुसार अॅडस्ट झालेले असते. याशिवाय, फिजिकल अॅक्टिव्हिटी चांगली असेल्यास शरीरातील मेटाबॉलिज्म चांगले राहते. आणि थंडी कमी वाजते. आपले बॉडी फॅट्स देखील थंडीपासून आपले संरक्षण करते. 9 / 9राहुल गांधींना थंडी का वाजत नाही- राहुल गांधी दीर्घकाळ भारत जोडो यात्रेत आहेत. यामुळे बाह्य वातावरणानुसार त्यांचे शरीर अॅडजस्ट झाले आहे. याशिवाय ते रोज चालतात आणि चांगल्या फिजिकल एक्टिव्हिटी मुळे त्यांना थंडी कमी जाणवते. आणखी वाचा Subscribe to Notifications