Why made in India Covaxin is priced higher than Covishield and Sputnik V
स्वदेशी Covaxin एवढी महागडी कशी? सर्वाधिक किंमत, कारण जाणून घ्या... By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2021 11:31 AM1 / 11पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी २१ जूनपासून सर्वांना केंद्र सरकारतर्फे मोफत लस दिली जाणार असल्याचे जाहीर केले आहे. मात्र, असे असले तरी २५% लसी खासगी रुग्णालयांना थेट लसनिर्मात्यांकडून खरेदी करता येणार आहेत. त्यासाठी केंद्राने लसींची किंमतही ठरवून दिली आहे. त्यात कोव्हॅक्सिन ही लस सर्वात महाग ठरली आहे. 2 / 11तज्ज्ञांच्या मते कोव्हॅक्सिन बनविण्याचे तंत्रज्ञान महाग असल्याने साहजिकच लसीची किंमतही जास्त आहे. (For all its “made in India” pitch, Covaxin is the most expensive Covid-19 vaccine in India)3 / 11कोव्हॅक्सिन लस तयार करण्यासाठी एका संपूर्ण निष्क्रिय विषाणूचा वापर केला जातो.4 / 11कोरोनाचा संपूर्ण निष्क्रिय केलेला विषाणू वापरून त्यापासून लस तयार करण्यासाठी शेकडो लिटर महागड्या सीरम आयात कराव्या लागतात5 / 11अत्युच्च सुरक्षित अशा जैवसुरक्षा प्रयोगशाळांमध्ये काळजीपूर्वक पद्धतीने या सीरम्समध्ये विषाणूची वाढ केली जाते. त्यानंतर विषाणू निष्क्रिय केला जातो.6 / 11इतर लसींच्या तुलनेत संपूर्ण प्रक्रिया महागडी असल्याने भारत बायोटेक आणि आयसीएमआर यांच्या संयुक्त विद्यमाने तयार केलेली कोव्हॅक्सिन लस महाग ठरते.7 / 11कोव्हॅक्सिनप्रमाणे या लसी तयार करण्यासाठी महागड्या तंत्रज्ञानाची आवश्यकता भासत नाही. 8 / 11या दोन्ही लसी एमआरएनए तंत्रज्ञानाचा वापर करून तयार करण्यात येत असल्याने त्यांच्यासाठी मोठ्या यंत्रणेची गरज नसते. या तंत्रज्ञानात प्रत्यक्ष कोरोना विषाणूचा वापर केला जात नाही.9 / 11लसीच्या किंमत निश्चितीत कच्चा माल, पॅकेजिंग, लस तयार करण्याची प्रक्रिया, तिची देखभाल, परवाना, वैद्यकीय चाचण्या, उत्पादनाचा खर्च इत्यादी घटकांचा समावेश असतो.10 / 11भारतीय लस उत्पादक प्रतिडोस ३ ते ४ रुपये फायदा कमावतात, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. 11 / 11भारतीय बनावटीची कोव्हॅक्सिन ही सर्वात महागडी लस ठरली आहे. कोविशिल्डहून दुपटीने कोव्हॅक्सिन लस महाग आहे आणखी वाचा Subscribe to Notifications