Why should you walk for 20 minutes after having dinner at night know reason and benefits
Health Tips : रात्री जेवण केल्यावर किती मिनिटे चालावं, जाणून घ्या याचे फायदे... By ऑनलाइन लोकमत | Published: November 18, 2021 12:28 PM1 / 8जास्तीत जास्त लोक काय करतात, सकाळी उठतात, नाश्ता करतात आणि आपल्या कामावर निघून जातात. कामाहून परत आल्यावर जेवण करतात आणि त्यानंतर झोपतात. हीच जास्तीत जास्त लोकांची लाइफस्टााईल असते. जर तुम्हीही असंच करत असाल तर वेळीच सावधान व्हा. कारण रात्री जेवणानंतर लगेच झोपायला जात असाल तर लठ्ठपणासहीत अनेक आजारांचे शिकार होऊ शकता.2 / 8देशातील प्रसिद्ध आयुर्वेद डॉक्टर अबरार मुल्तानी यांच्यानुसार, जेवणानंतर आपण फिरायला हवं. याने शरीराचा प्रत्येक अवयव आणि मांसपेशी योग्य प्रकारे काम करतात. याने ब्लड सर्कुलेशन योग्यप्रकारे काम करतं. टाइप २ डायबिटीसच्या रूग्णांनीही जेवण केल्यावर थोडावेळी शतपावली करावी. त्याने ब्लड शुगर कमी होते.3 / 8हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, रात्री जेवण केल्यावर कमीत कमी २० मिनिटे चाललं पाहिजे. जर तुमच्याकडे जास्त वेळ असेल तर तुम्ही जास्त वेळ चालू शकता. पण हे लक्षात ठेवा की, तुम्ही जेवण केल्यावर एक तासाच्या आतच चालायचं आहे.4 / 8वजन कमी होतं - हेल्थ एक्सपर्ट सांगतात की, जेवण केल्यावर २० मिनिटे पायी चाललात तर लठ्ठपणाचा धोका बराच कमी होतो. कारण पायी चालल्याने मेटाबॉलिज्म बूस्ट होतं आणि वजन कमी करण्यासाठी तुमचं मेटाबॉलिज्म योग्य असावं लागतं.5 / 8इम्यूनिटी वाढते - रात्री जेवण केल्यावर चालल्याने इम्यूनिटी वाढण्यास मदत मिळते. कारण याने तुमच्या इम्यून सिस्टीममधून टॉक्सिन बाहेर निघतं. पायी चालणं आपल्या अंतर्गत अवयवांसाठी चांगलं असतं.6 / 8ब्लड शुगर नियंत्रित - जेवण केल्यावर काही वेळाने शरीरात ब्लड शुगर लेव्हल वाढणं सुरू होतं. जेव्हा तुम्ही रात्री जेवण केल्यावर फिरता, तेव्हा याने ब्लड शुगर नियंत्रित राहतं. याने हायपरग्लेसेमियाचा धोकाही कमी होतो.7 / 8डिप्रेशनमध्ये फायदेशीर - जेवण केल्यावर पायी चालल्याने तुमच्या शरीरात एंडोर्फिनला मुक्त करून तणाव कमी होतो. ज्यामुळे तुम्हाला चांगलं वाटतं.8 / 8पचनक्रिया सुधारते - रात्रीच्या जेवणानंतर फिरायला गेल्याने आपलं पचन तंत्र चांगलं राहतं. याने सूजन कमी होते, जुलाब होण्याचा धोका टळतो आणि पोटासंबंधी अनेक समस्यांपासून सुटका मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications