Why there is a red line on medicines strip know the reason
औषधांच्या गोळ्याच्या पाकिटावर लाल लाईन का असते? जाणून घ्या कारण.... By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2023 1:30 PM1 / 6आजकाल आजारांचं प्रमाण खूप जास्त वाढलं आहे. याचं कारण लोकांची खूप बदललेली लाइफस्टाईल आहे. चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे लोकांना सतत औषधांचा आधार घ्यावा लागत आहे. लोकांच्या घरांमध्ये औषधं आणि गोळ्यांच्या स्ट्रीपचा ढीग लागलेला असतो. पण लोक डोळेझाकपणे या गोळ्यांचं सेवन करतात. 2 / 6गोळ्यांच्या स्ट्रीपवरील माहिती ते नीट वाचत नाहीत. तसेच त्यावरील संकेताची माहितीही घेत नाहीत. तुम्ही अनेकदा पाहिलं असेल की, गोळ्यांच्या स्ट्रीपवर लाल रंगाची रेष असते. पण याचा अर्थ काय होतो हे माहीत आहे का? नाही ना? चला जाणून घेऊन या लाल रेषेचा अर्थ....3 / 6लाल रंगाच्या या रेषेबाबत सर्वसामान्य लोकांना याची काहीच माहिती नसते. अशात लोक डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय कोणतंही औषध मेडिकलमधून घेतात आणि नंतर त्यांना समस्येचा सामना करावा लागतो. त्यामुळे औषधांची खरेदी करताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते.4 / 6लाल रंगाच्या रेषेशिवाय औषधांच्या स्ट्रीपवर आणखीही बऱ्याच गोष्टी लिहिलेल्या असतात. ज्यांबाबत तुम्हाला माहीत असणं गरजेचं आहे. काही गोळ्यांच्या पाकिटांवर Rx असं लिहिलेलं असतं, ज्याचा अर्थ असा होतो की, हे औषध डॉक्टरांच्या सल्ल्यानेच घ्यावं.5 / 6तर औषधांच्या ज्या पाकिटांवर NRx लिहिलेलं असतं. त्याचा अर्थ असा होतो की, हे औषध घेण्याचा सल्ला फक्त तेच डॉक्टर देऊ शकतात ज्यांना नशेच्या औषधांचं लायसन्स असतं.6 / 6काही औषधांच्या पाकिटांवर XRx लिहिलेलं असतं आणि याचा अर्थ होतो की, हे औषध केवळ डॉक्टरांकडूनच घेतलं जाऊ शकतं. हे औषध डॉक्टर थेट रूग्णांना देऊ शकतात. रूग्ण हे औषध कोणत्याही मेडिकल स्टोरमध्ये खरेदी करू शकत नाहीत. भलेही डॉक्टरांनी चिठ्ठी लिहून दिली असेल. आणखी वाचा Subscribe to Notifications