शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

रात्री बेडजवळ ठेवा लिंबाचा कापलेला एक तुकडा, कधी विचारही केला नसेल इतके होतील फायदे!

By ऑनलाइन लोकमत | Published: August 10, 2022 5:09 PM

1 / 8
लिंबाचा वापर वेगवेगळ्या पदार्थांची चव आणखी चांगली करण्यासाठी केला जातो हे तुम्हाला माहीत आहेच. सोबतच याचे आरोग्याला आणि सौंदर्य खुलवण्यातही किती फायदे होतात हेही तुम्हाला माहीत असेलच. आज आम्ही तुम्हाला लिंबाचे असेच काही वेगळे फायदे सांगणार आहोत. कदाचित अशा फायद्यांचा तुम्ही कधी विचारही केला नसेल.
2 / 8
लिंबाचा एक तुकडा बेडजवळ ठेवल्याने शरीर आणि मनाला कितीतरी फायदे होतात. यासाठी तुम्हाला इतकंच करायचं आहे की, लिंबाचा एक तुकडा घ्या आणि त्यावर थोडं मीठ टाका. हा लिंबाचा तुकडा बेडच्या जवळ ठेवा. हे ऐकायला थोडं विचित्र वाटू शकतं, पण तज्ज्ञांनी दावा केला आहे की, असं केल्याने फारच चांगले फायदे होतात.
3 / 8
नाक मोकळं करा - अनेकांना लिंबाचा सुगंध फार आवडतो. याचा सुगंध केवळ रिफ्रेशिंग नाही तर अॅटीं-बॅक्टेरिअलही असतो. जर सर्दीमुळे तुमचं नाक बंद झालं असेल तर रात्री झोपताना बेडच्या बाजूला नाकाजवळ कापलेलं लिंबू ठेवा. याने तुम्हाला चांगली झोपही येईल आणि नाकही मोकळं होईल.
4 / 8
तणावापासून मुक्ती - लिंबाच्या सुगंधाला डी-स्ट्रेसिंग मानलं जातं. कारण या सुगंधाने तणाव कमी होतो आणि आपल्या इंद्रियांना आराम मिळतो. जर तुम्हाला फार थकवा जाणवत असेल किंवा तुम्ही तणावात असाल एक लिंबाचा तुकडा तुमची ही समस्या दूर करू शकतो.
5 / 8
माशा आणि डास पळवा - माशा आणि डासांना लिंबाचा सुगंध पसंत नसतो. त्यामुळे माशा आणि डासांनी हैराण झाले असाल किंवा झोपेचं खोबरं होत असेल तर झोपताना जवळ एक कापलेलं लिंबू ठेवा. त्यावर दोन तीन लवंग लावा. याने तुमच्याजवळ ना माशा येतील ना डास येतील.
6 / 8
इनसोमेनिया - झोप न येणं ही वेगवेगळ्या गंभीर समस्यांची सुरूवात असू शकते. जर तुम्हाला झोप न येण्याची म्हणजे इनसोमेनियाची समस्या असेल तर हा फंडा तुमच्या फायद्याचा ठरू शकतो. याने तुम्हाला चांगली झोप येऊ शकते.
7 / 8
सकाळी होईल रिफ्रेशिंग - वेगवेगळ्या रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, लिंबाचा सुगंध शरीरात सेरोटोनिन हार्मोनचं प्रमाण वाढवतं. हे सेरोटोनिन हार्मोनच चांगल्या झोपेसाठी फायद्याचे असतात. त्यामुळे चांगल्या झोपेसाठी लिंबाचा असा वापर तुम्ही करूच शकता.
8 / 8
हवेची गुणवत्ता - काही समस्या असली म्हणजेच लिंबाचा असा वापर करावा असं काही नाही. रूममधील हवेची गुणवत्ता चांगली नसेल तर तुम्ही लिंबाच्या तुकड्याचा वापर करू शकता. लिंबाच्या एका तुकड्याने रूममधील हवा ताजीतवाणी होऊ शकते. याने रूममधील हवेची गुणवत्ता सुधारू शकते.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य