शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

सावधान ! उभे राहून पाणी पिताय, होऊ शकतात हे भयंकर त्रास

By ऑनलाइन लोकमत | Published: June 27, 2018 4:45 PM

1 / 6
चुकीच्या पद्धतीनं पाणी प्यायल्यानं अनेक आजार होऊ शकतात. पाणी नेहमी हळूहळू प्यावे, यास वॉटर थेरपी म्हटले जाते. उभे राहून पाणी प्यायल्याने पाणी अन्ननलिकेद्वाके वेगाने खाली वाहून जाते. सारखं असे होण्याने पचनतंत्र बिघडते. यामुळे हृदयालासुद्धा नुकसान पोहोचू शकते.
2 / 6
उभे राहून पाणी प्यायल्यानं पाणी किडनीमधून योग्य रितीने फिल्डर न होता वाहून जाते. वेळेसोबत तुमच्या मूत्राशय आणि रक्तामध्ये घाण जमू लागते. जर हीच स्थिती जास्त काळापर्यंत राहिली तर मूत्राशय, हृदय आणि किडनीचे विकार होऊ शकतात.
3 / 6
जर तुम्ही उभे राहून पाणी पीत असाल तर भविष्यात संधिवातासारखे भयंकर आजार जडू शकतात. उभे राहून पाणी प्यायल्याने शरीरातील द्रव पदार्थांचे संतुलन बिघडते. पाणी सरळ तीव्र वेगाने खालच्या दिशेनं जाते. जे सांध्यांमध्ये असलेल्या द्रवपदार्थांचे संतुलन बिघडवून तिथे गोठवण्याची प्रक्रिया सुरू होते. यामुळे सांधेदुखी आणि गाठ येण्यासारख्या समस्या निर्माण होतात.
4 / 6
उभे राहून पाणी प्यायल्यानं लवकर तहान भागत नाही.
5 / 6
बसून पाणी प्यायल्यानं पोटाला आराम मिळतो. ज्यामुळे पोटाचे कार्य अधिक चांगल्या पद्धतीनं सुधारते. उभे राहून पाणी प्यायल्यानं अपचन यांसारख्या समस्या वाढतात.
6 / 6
थंड पाणी कधीही पिऊ नये कारण आपल्या शरीराचे तापमान 37 डिग्री सेंटीग्रेड असते. त्यापेक्षा कमी तापमान असलेले पाणी प्यायल्यास आरोग्यावर दुष्परिणाम होतात. बाहेरुन प्रवास करुन आल्यानंतर लगेचच उभे पाणी कधीही पिऊ नये कारण पाण्याचा काही अंश फुफ्फुसात जाऊ शकतो.
टॅग्स :Healthआरोग्यWaterपाणी