winter diet : for soft and glowing skin 7 seasonal things to add in winter diet
Winter Diet : हिवाळ्यात ही सात फळे खा आणि नितळ त्वचा मिळवा By ऑनलाइन लोकमत | Published: November 01, 2018 3:07 PM1 / 71. गाजर :नितळ, सतेज त्वचेसाठी गाजराचे सेवन करणं फायदेशीर असते. यामध्ये व्हिटॅमिन अ चे प्रमाण भरपूर असते. यामुळे त्वचेला ओलावा मिळतो आणि कोरड्या त्वचेच्या समस्येपासून मुक्तता मिळते. 2 / 72. तुरट फळे : हिवाळ्यात तुरट फळांचं सेवन करावं. उदाहरणार्थ, संत्री-मोसंबी यामध्ये व्हिटॅमिन सी, अमिनो अॅसिड, लायसिन आणि प्रोलाइनसारखी पोषकतत्त्वं असतात. यामुळे त्वचा मऊ राहते आणि कोणत्याही प्रकारच्या समस्या होत नाहीत. 3 / 73. हंगामी भाज्या : टोमॅटो, पालक, लसूण यांच्या सेवनामुळे त्वचेला चांगला फायदा होतो. यामध्ये केरोटीन तत्त्व असते. जे रक्त शुद्ध करण्यास मदत करते. यामुळे मुरुमांसारख्या समस्या होत नाहीत आणि सतेज त्वचा मिळते. 4 / 74. सिंघाडा : हिवाळ्यात मिळणारे सिंघाडा हे आरोग्यासाठी फायदेशीर आहेच, पण सौंदर्यासाठीचा देखील हा एक खजाना आहे. सिघाडामध्ये सायट्रिक अॅसिड, कार्बोहायड्रेट्स, बीटा-अॅमिलेज, प्रोटीन, विटामिन्स-अ आदी पोषक तत्त्वं आहेत. याच्या सेवनामुळे त्वचेच्या समस्या सुटण्यास मदत होते.5 / 75. संत्रे : संत्र्यांमध्ये व्हिटॅमिन सीचे प्रमाण भरपूर प्रमाणात असते. संत्रे खाल्ल्यानं मुरुमं, पुरळ इत्यादी समस्या कमी होण्यास मदत होते. शिवाय,याचे सेवन केल्यास त्वचा कोरडीदेखील होत नाही. 6 / 76. लाल द्राक्ष : लाल द्राक्षांमध्ये फोलेट, पोटॅशिअम, लोह, कॅल्शियम आणि व्हिटॅमिन्स भरपूर प्रमाणात असते. लाल द्राक्षांच्या सेवनामुळे शरीरात ओलावा कायम राहण्यास मदत होते. यामुळे हिवाळ्यात लाल द्राक्षाचा आहारात समावेश करावा.7 / 77. रताळे : रताळ्याच्या सेवनामुळे शरीराला व्हिटॅमिन अ आणि सी मिळते. हिवाळ्यात रताळ्याचे सेवन करणं शरीरासाठी अतिशय फायदेशीर ठरते. आणखी वाचा Subscribe to Notifications