शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

146 वरून थेट 60 किलो; लॉकडाऊनमध्ये जिमशिवाय महिलेने कमी केले वजन, सोशल मीडियावर कौतुक!

By ऑनलाइन लोकमत | Published: April 22, 2021 2:20 PM

1 / 10
फिट राहण्यासाठी लोक अनेक उपाय करतात. यासाठी जिमला जातात, विविध प्रकारचे वर्कआउट करतात. परंतु विचार करा की जर हे सर्व न करता कोणी हिट झाले, तर कदाचित ही आश्चर्यकारक बाब होईल.
2 / 10
खरंतर, आयर्लंडमधील कार्ला फिट्झरगार्ड या महिलेने लॉकडाऊन दरम्यान काहीतरी असे केले, ज्यामुळे तिचे वजन 146 किलोवरून 60 किलोपर्यंत कमी झाले. 14 महिन्यांपूर्वी कार्लाचे वजन इतके जास्त होते की तिला त्रास होत होता.
3 / 10
डेली मेलच्या वृत्तानुसार, तिने केवळ आपल्या आहारात स्मार्ट पद्धतीने बदल करून असे केले आहे. कार्लाने सांगितले की, वजन कमी करण्यासाठी तुम्हाला कॅलरी पूर्णपणे कमी करण्याची गरज नाही, परंतु हळूहळू ते कमी केल्या पाहिजे, आधी मी कॅलरी नियंत्रित आहार घेणे सुरू केले आणि कमीतकमी वर्कआउट केले.
4 / 10
कार्ला म्हणाली की, वजन कमी झाल्यामुले मला स्वत:ला स्वतंत्र असल्याचे वाटते. आयुष्यात मी पहिल्यांदाच आता फॅशनचा आनंदही घेत आहे. पूर्वीचे आयुष्य इतके चांगले वाटत नव्हते.
5 / 10
वजन कमी झाल्यानंतर कार्ला खूप आनंदी आहे. ज्या प्रकारे वजन कमी पाहिजे होते, तसे झाल्यामुळे कार्लाला खूप आनंद झाला आहे. ती म्हणते की, मी आता एक वेगळी व्यक्ती आहे. गर्व, आनंद आणि आशा यांनी मी परिपूर्ण आहे.
6 / 10
याआधीही वजन कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न केले, पण ते यशस्वी झाले नाहीत, असेही कार्लाने सांगितले. कार्लाला थोड्या थोड्या वेळाने काहीतरी खायची सवय लागली होती.
7 / 10
त्यामुळे ती तीन ते पाच हजार कॅलरी खात होती. लॉकडाऊन दरम्यान कार्लाने या सवयीवर लक्ष केंद्रित केले, ज्यामुळे तिची सवय देखील नियंत्रित झाली.
8 / 10
दरम्यान, वजन कमी झाल्यानंतर कार्ला सध्या चांगले आयुष्य जगत आहे. आधी तिला बसण्यासाठी तिच्या आकाराची जागा मिळत नव्हती. फ्लाईटमध्ये बसण्यासाठी सुद्धा अडचण होत होती. कपडे सुद्धा परिधान करण्यासाठी मर्यादित होते. मात्र, आता ती तिच्या आवडीचे कपडे परिधान करत आहेत.
9 / 10
कार्लाने तिचे फोटो स्वतःच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये तिने आपल्या जुन्या लूक आणि नवीन लूकचीही तुलना केली आहे.
10 / 10
सोशल मीडियावर लोकांनी या फोटोंना लाईक केले आहे. तसेच, वजन कमी करण्यासाठी कठोर परिश्रम केल्याबद्दल कार्ला हिचे कौतुक करण्यात येत आहे.
टॅग्स :Fitness Tipsफिटनेस टिप्सHealthआरोग्य