शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

World aids day 2020: फ्लू प्रमाणेच सामान्य असू शकतात एड्सची लक्षणं; वेळीच दूर करा आजाराबाबत 'हे' गैरसमज

By ऑनलाइन लोकमत | Published: December 01, 2020 11:42 AM

1 / 8
एड्स आजसुद्धा जगभरातील सगळ्यात गंभीर आजारांपैकी एक आहे. जागतिक आरोग्य संघटनेनं दिलेल्या माहितीनुसार २०१९ च्या शेवटापर्यंत ३ कोटी ८० लाख लोकांना एड्सचा सामना करावा लागला होता. UNAIDS च्या रिपोर्ट्सनुसार २०१९ मध्ये एड्स १७ लाख नवीन केसेस समोर आल्या आहेत. एड्सबाबत जगभरातील लोकांमध्ये जागरूकता पसरवण्यासाठी १ डिसेंबरला वर्ल्ड एड्स डे साजरा केला जातो.
2 / 8
एचआईवी-एड्स हा आजार लोाकांसाठी काही नवीन नाही तरी सुद्धा या आजाराबाबत अनेक गैरसमज प्रचलित आहेत. हा आजार औषधांनी नियंत्रणात ठेवला जाऊ शकतो. आत्तासुद्धा अनेकांना असं वाटतं की एचआयव्ही पॉजिटिव्ह व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हा आजार पसरतो. पण हा आजार एखाद्याला स्पर्श केल्यामुळे उद्भवत नाही. लोकांमध्ये या आजाराबाबत जनजागृती तयार करण्यासाठी हा दिवस साजरा केला जातो.
3 / 8
पहिलं लक्षणं - तज्ज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार एचआयव्हीची लक्षणं तीन वेगवेगळ्या टप्प्यावर आधारित असतात प्रत्येकाच्या शरीरात एचआयव्हीची लक्षणं समान असतील असं अजिबात नाही. २ ते ४ आठवड्यामधून दोन तृतीयांश लोकांना एचआयव्ही प्रमाणे फ्लू ची लक्षणं दिसून येतात. ताप, रात्रीच्यावेळी घाम येणं, मासपेशींतील वेदना, घश्यातील वेदना, थकवा जाणवणं, तोंडाला छाले पडणं, शरीरावर लाल चट्टे येणं अशा समस्या उद्भवतात. तुम्हालाही अशा समस्या जाणवत असतील तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या.
4 / 8
यानंतरत्या टप्प्यात व्हायरसची एकापेक्षा जास्त लक्षणं दिसू लागतात. या स्थितीला क्रोनिन एचआयव्ही इंन्फेक्शन असं म्हणतात. या आजारांवर उपचार न घेतल्या लोक १० ते १५ वर्षांपर्यंत राहू शकतात. एचआयव्ही संक्रमण झाल्यास योग्य उपचार न घेतल्यास हा व्हायरस वेगाने वाढू शकतो. इम्यून सिस्टिम यामुळेच खराब होण्याची शक्यता असते. त्यानंतर वेगाने वजन कमी होणं, ताप येणं, रात्रीच्यावेळी घाम फुटणं अशा समस्या वाढतात.
5 / 8
तिसऱ्या टप्प्यात शरीराच्या विविध अवयवांना सूज येणं याशिवाय डायरियाची समस्याही उद्भवू शकते. या स्टेजमध्ये तोंड, त्वचा, नाक लाल होणं अशा समस्या उद्भवतात. अनेकदा डिप्रेशनसह न्युरोलोजिकल डिर्सॉर्डरर्सचा सामना करावा लागतो. अशा प्रकारची लक्षणं इतर आजारांचेसुद्धा कारण ठरू शकतात. म्हणूनच घाबरण्याआधी तपासणी करून घ्या.
6 / 8
एचआयव्ही पॉजिटिव्ह व्यक्तीला स्पर्श केल्यानंतर हा व्हायरस पसरत नाही. एचआयव्ही असलेल्या व्यक्तीला स्पर्श केल्यास किंवा हात मिळवल्यानंतर या व्हायरसचं संक्रमण होत नाही. काहीजणांचा असा समज आहे की, एचआयव्ही पॉजिटिव्ह डास एखाद्या व्यक्तीला चावला तर त्या व्यक्तीला या आजाराचं संक्रमण होऊ शकतं. पण कोणताही डास चावल्यानंतर एचआयव्ही पसरत नाही. कारण डासांच्या शरीरात हा व्हायरस जीवंत राहू शकत नाही.
7 / 8
या आजाराने संक्रमित असलेल्या व्यक्तीला किस केल्यामुळे एड्स होतो. असा अनेकांचा समज आहे. पण हा आजार किस केल्यामुळे पसरत नाही तर सेक्शुअली संपर्क झाल्यास हा आजार पसरतो. एचआयवी पॉजिटिव्ह व्यक्तीने कपडे किंवा त्या व्यक्तीने हात लावलेल्या कोणत्याही वस्तूपासून पसरतो. असा गैरसमज लोकांच्या मनात आहे. एचआईव्हीने पॉजिटिव्ह असलेल्या व्यक्तीने वापर केलेल्या बाथरूमचा वापर केल्यास हा आजार पसरत नाही. हा व्हायरस सीमेन, लाळ आणि रक्तामार्फत पसरतो.
8 / 8
एचआयवी एड्स वातावरणातील हवेमार्फत श्वासामार्फत पसरत नाही. तसंच संक्रमित व्यक्तीकडून वस्तूंची देवाण केल्यामुळेसुद्धा हा आजार पसरत नाही. व्यायाम करत असताना उपकरणांचा स्पर्श केल्यास हा आजार पसरू शकत नाही.
टॅग्स :HIV-AIDSएड्सHealth Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य