"आणखी अनेक वर्षं कोरोनापासून सुटका नाही, कोवीड-१९चं नवं रूप संकटांचा संकेत!"
By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 13:47 IST
1 / 9भारतासह जगातील अनेक देशांत कोरोनाने पुन्हा एकदा हाहाकार घातला आहे. यातच आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF) आणि विश्व बँकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय समितीने विकसनशील देशांना सावध केले आहे.2 / 9 आणखी अनेक वर्ष दिसेल कोरोनाचा प्रभाव - IMF आणि जागतीक बँकेच्या संयुक्त मंत्रिस्तरीय समितीने म्हटल्याप्रमाणे, कोविड-19 महामारीचा प्रभाव अणकीही अनेक वर्षांपर्यंत बघायला मिळेल. म्हणजेच या महामारीपासून जगाची लवकर सुटका होणार नाही. या समितीने दोन्ही जागतिक आर्थिक संस्थांना सर्व देशांना सुरक्षित आणि प्रभावी लशीचा पुरवठा निश्चित करावा, असेही सांगितले आहे.3 / 9विकसनशील देशांनी लसीकरणावर भर द्यावा - विकसनशील दोशांनी लसीकरण अभियानाची तयारी पूर्ण करायला हवी. तसेच त्यांनी योग्य नियोजन करून देशातील गरजू लोकांपर्यंत पोहोचायला हवे. 4 / 9कोरोना व्हायरसचं नवं रूप संकटाचा संकेत आयएमएफ आणि जागतीक बँकेकडून वसंत (स्प्रिंग) बैठकीनंतर जारी करण्यात आलेल्या निवेदनात म्हणण्यात आले आहे, की 'कोरोनाच्या नव्या रुपाच्या पार्श्वभूमीवर, या महामारीचा खात्मा करण्याच्या दृष्टीने जगातील सर्वच देशांना सुरक्षित आणि प्रभावी लशींचा पुरवठा वेळेवर होणे अत्यंत आवश्यक आहे. 5 / 9या समितीने म्हटले आहे, की कोरोना महामारीने आरोग्य, अर्थ आणि सामाजिक संकट निर्माण केले आहे. यामुळे कोट्यवधी लोकांचा जीव आणि उपजिविका धोक्यात आली आहे.6 / 9पीटीआयने दिलेल्या वृत्तानुसार, समितीने म्हटले आहे, की आर्थिक फटक्यामुळे गरिबीची असमानता वाढली आहे आणि विकासाच्या लाभावरील संकटही गडद झाले आहे. पण, जागतिक अर्थव्यवस्था धीम्याकतीने पुन्हा रुळावर यायला सुरुवात झाली आहे. मात्र, मध्यम अवधीच्या संभावनेसंदर्भात अनिश्चितता आहेत.7 / 929 लाखहून अधिक लोकांचा मृत्यू - जॉन हॉपकिन्स विद्यापीठाने दिलेल्या महितीनुसार, जगभरात आतापर्यंत 13,54,45,099 लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 29,14,590 जनांचा कोरोनाने बळी घेतला आहे. 8 / 9समितीने विकसनशील दोशांत लस उत्पादन क्षमता आणि महामारीशीसंबंधित मेडिकल पुरवठा दुप्पट करण्यावर भर दिला आहे. 9 / 9आयएमएफ आणि जागतिक बँकेच्या बैठकीनंतर समितीने आपल्या निवेदनात म्हटले आहे, की द्विपक्षीय आणि बहुपक्षीय संघटनांमध्ये चांगला समन्वय असायला हवा. आम्ही जागतिक बँक आणि आयएमएफला आवाहन करतो, की त्यांनी एकत्रितपणे आणि इतर भागधारकांसोबत मिळून या महामारीचा प्रभाव नियंत्रणात आणण्यासाठी प्रयत्न व्हायरला हवा.