World Cancer Day : do not ignore these symptoms it could lead to life threatening cancer
World Cancer Day : सावधान ! या लक्षणांकडे करू नका दुर्लक्ष By ऑनलाइन लोकमत | Published: February 04, 2019 3:51 PM1 / 9वजन वाढणे तसंच कमी होणे, यावरुन बहुतांश महिला अतिशय चिंतेत येतात. पण अचानक अथवा कारणाशिवायच जर तुमचे वजन घटत असल्यास याकडे दुर्लक्ष करू नका. डॉक्टरांचा वेळीच सल्ला घ्या. 2 / 9पुरेसा आराम आणि झोप मिळत असताना दिवसभर थकवा जाणवणे. हे देखील एक कॅन्सर रोगाचे लक्षण असू शकते.3 / 9कोणत्याही कारणाविना पोट फुगणे, वारंवार बद्धकोष्ठतेची समस्या उद्भवल्यास वेळीच सावध व्हा. ही लक्षणं ओव्हेरियन आणि युरिटाइन कॅन्सरची असू शकतात.4 / 9बहुतांश जणांना सकाळी नाश्त्यामध्ये ब्रेड खाणे पसंत असते. अनेकदा ब्रेड भाजताना तो करपतो. करपलेल्या ब्रेडकडे आपण दुर्लक्ष करतो. पण करपलेला ब्रेड खाणे टाळावे, यामुळे कॅन्सरसारखा गंभीर आणि जीवघेणा आजार होतो. 5 / 9वारंवार होणाऱ्या पोटदुखीकडे दुर्लक्ष करू नये. विनाकारण येणारी सूज आणि रक्तस्त्रावामुळे ओटी पोट दुखते. याकडे दुर्लक्ष न करता डॉक्टरांकडे जाऊन औषधोपचार करावेत. ही समस्या पुरुष-महिला दोघांनाही होऊ शकते. 6 / 9कंबरदुखीचा त्रास होत असल्यास हे लक्षण ओव्हेरियन कॅन्सरचे असू शकते. 7 / 9ब्रेस्टच्या रंगामध्ये तुम्हाला बदल जाणवल्यास, याकडे दुर्लक्ष करू नका. कारण हे ब्रेस्ट कॅन्सरचे संकेत आहेत. हे संकेत मिळाल्यास तातडीने तपासणी करुन घ्यावी. 8 / 9कोणताही मार न लागताच जर तुमच्या अंगावर जखमा दिसत असतील तर डॉक्टरांकडे जा. लाल किंवा काळ्या रंगाचे वेदनादायी चट्टे शरीरावर येत असतील, तर ही लक्षणं त्वचेच्या कॅन्सरशी संबंधित आहेत. 9 / 9निरोगी राहणारा एखादा व्यक्ती अचानक आजारी पडणे आणि त्याला आलेला ताप दीर्घकाळापर्यंत अंगात राहणे, हे लक्षणदेखील कॅन्सर आजाराशी संबंधीत आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications