शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

World Diabetes Day : 'या' 4 कारणांमुळे महिलांमध्ये वाढतो मधुमेहाचा धोका!

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:43 PM

1 / 5
तुम्हाला माहीत आहे का? पुरूषांच्या तुलनेत महिलांना मधुमेहाचा धोका अधिक असतो. धकाधकीची जीवनशैली, तणाव आणि लठ्ठपणा यांसारख्या कारणांमुळे महिलांमध्ये मधुमेहाची लक्षणं जास्त आढळून येत आहेत. याच कारणांबाबत अनेक तज्ज्ञांनी बोलताना सांगितले की, अनेक महिला आपल्या प्रकृतीपेक्षा आपल्या कुटुंबाच्या प्रकृतीकडे जास्त लक्ष देतात. घरातील सर्वांच्या गरजा पूर्ण करता करता आपल्या प्रर्कृतीकडे मात्र दुर्लक्ष करतात. याव्यतिरिक्त अनेक महिला आपल्या मेडिकल टेस्ट करत नाहीत. त्यामुळे अनेकदा या आजारांची लक्षणं लक्षात येत नाहीत.
2 / 5
सध्या बदललेल्या जीवनशैलीमुळे, सतत कामाचा ताण यांमुळे अनेक लोक डिप्रेशनमध्ये आहेत. या आजाराचे परिणाम पुरूषांच्या तुलनेत मधुमेहाने पीडित असलेल्या महिलांवर जास्त होतो. अनेक रिसर्चमधून असं सिद्ध झालं आहे की, डिप्रेशनमुळे अनेक अनेक महिलांमध्ये मधुमेहाचा धोका वाढतो.
3 / 5
गर्भकालीन मधुमेह असलेल्या महिलांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते. अशा महिलांना भविष्यात मधुमेह होण्याचा धोक वाढतो.
4 / 5
अनेक रिसर्चमधून हे सिद्ध झालं आहे की, मधुमेहाने पीडित असलेल्या पुरूषांच्या तुलनेत महिलांना हृदयाशी निगडीत आजार होण्याचा धोका अधिक असतो.
5 / 5
सध्या अनेक महिलांना पीसीओडीच्या त्रासाचा सामना करावा लागतो. एका अभ्यासातून असं समोर आलं आहे की, पीसीओडी असणाऱ्या महिलांमध्ये मधुमेहाचा धोका अधिक असतो.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य