World first corona virus patient is still unknown and she can not be found even after one year
कुठे आहे कोरोना व्हायरसचा पहिला रुग्ण?; १ वर्षानंतर समोर आलं सत्य By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 8:11 PM1 / 7चीनची महिला वैज्ञानिक सगळ्यात पहिली कोरोना पॉझिटीव्ह महिला असल्याचे सांगितले जात आहे. या माहामारीदरम्यान ही महिला अनेक दिवस गायब होती. अनेकदा पाठपुरावा केल्यानंतरही या महिलेचं नाव समोर आलं नाही. व्हायरस एक्सपर्ट्स ह्युांग येनलिंग यांचे नाव फ्रेबुवारी २०२० मध्ये चर्चेत आले होते. 2 / 7वुहान इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीमधील संशोधक ह्युांह येनलिंन या कोरोना व्हायरसच्या सगळ्यात पहिल्या रुग्ण असल्याचे सांगितले जात आहे. ह्युांग यांनी फ्रेबुवारी २०२० मध्ये ऑनलाईन रिपोर्ट्समध्ये पेशेंट झिरो असा उल्लेख केला होता. 3 / 7जेव्हा व्हायरसने चीनमध्ये हाहाकार पसरवायला सुरूवात केली. त्यावेळी अधिक माहिती समोर येण्याआधीच ही महिला कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे सांगितले जात आहे. 4 / 7वुहानचे प्रशासन आणि लॅब एजेंट्सने या महिलेचे बेपत्ता झाल्याचे रिपोर्ट समोर आणण्यास नकार दिला होता. या रिपोर्ट्सना इंटरनेटवरूनही हटवण्यात आलं होतं. 5 / 7आता ही महिला पूर्णपणे सुरक्षित असून या महिलेनं आपली नोकरी बदलला असल्याची माहिती समोर येत आहे. चीनच्या एक वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार या महिलेच्या नवीन कंपनीतील लोकांशीही संवाद साधला जात आहे.6 / 7द मेलच्या एका रिपोर्टनुसार चीनने आतापर्यंत या महिलेला समोर येऊ दिलेलं नाही. समोर आलेल्या माहितीनुसार या महिलेला मारहाण करून कैद करून ठेवण्यात आलं होतं. 7 / 7जेणेकरून कोरोना व्हायरसच्या माहामारीबाबत जगाला माहिती देता येऊ शकते. ही माहामारी आणि वुहान इंस्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीमध्ये काहीतरी संबंध असल्याचा दावा केला जात आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications