World Health Day 2022 : Poor health and serious illness warning signs
World Health Day 2022 : हे ७ संकेत सांगतात शरीरात आहे मोठी गडबड, वेळीच व्हा सावध! By ऑनलाइन लोकमत | Published: April 07, 2022 11:12 AM1 / 8World Health Day 2022 : वर्ल्ड हेल्थ डे दरवर्षी ७ एप्रिलला असतो. यावर्षीची थीम आहे 'Our Planet, Our Health'. चांगलं आरोग्य मनुष्यांसाठी फार गरजेचं असतं हे आपण नेहमीच ऐकत असतो किंवा वाचत असतो. चांगलं आरोग्य असेल तर सगळं चांगलं होतं नाही तर त्रासासोबतच पैशांची नासाडी, इतरांना त्रास या गोष्टी होतात. पण तरीही लोक आरोग्याबाबत तेवढे सीरिअस दिसत नाहीत. जगभरात अनेक लोक वेगवेगळ्या आजारांनी ग्रस्त आहेत. अनहेल्दी लाइफस्टाईल आणि चुकीच्या खाण्या-पिण्याच्या सवयी यामुळे जास्तीत जास्त समस्या होतात. या समस्यांमुळे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरात काही लक्षणे दिसू लागतात. शरीर काही संकेत देऊ लागतं. ती काय असतात हे आम्ही सांगणार आहोत.2 / 8नकळत वजन कमी होणे - अमेरिकन कॅन्सर सोसायटीचे अधिकारी रिचर्ड वेंडर यांच्यानुसार, जर कोणत्याही डाएटशिवाय किंवा एक्सरसाइज शिवाय तुमचं वजन १० पाउंडने कमी झालं तर लगेच डॉक्टरांशी संपर्क साधावा. अचानक वजन कमी होण्याचं कारण अग्नाशय, पोट, ग्रासनळी किंवा फुप्फुसाचा कॅन्सर असू शकतो.3 / 8दात तुटणे - यूनिव्हर्सिटी ऑफ नॉर्थ कॅरोलिनातील तज्ज्ञ इवान डेलन यांच्यानुसार, ज्या लोकांचे सतत दात तुटतात, त्यांना अॅसिड रिफ्लक्सची समस्या असू शकते. यात अॅसिडमुळे दात सतत तुटतात. दातांचे तुकडे पडतात.4 / 8घोरणे - अनेक लोकांना जोरजोरात घोरण्याची सवय असते. अनेकदा घोरण्यामुळे झोपही येत नाही आणि हा प्रकार लाजिरवाणाही आहे. पण घोरणं हा संकेत असू शकतो की, तुम्ही निरोगी किंवा फिट नाही आहात. घोरण्याचा संबंध स्लीप एपनिया, जास्त वजन, हृदयरोग आणि स्ट्रोक इत्यादींसोबत असतो. वेळीच डॉक्टरांशी बोला.5 / 8स्किन स्वच्छ नसणे - त्वचेवर काही डाग असे हाही एक आरोग्यासंबंधी गंभीर संकेत असू शकतो. जर कुणाला पिंपल्स, खाज होत असेल ही मोठी समस्या असू शकते. कपाळावर पिंपल्स येणं म्हणजे खराब लाइफस्टाईल, कमी झोप, खराब डाएटमुळे हे होतं. 6 / 8डोळ्यांचा रंग बदलणे - एक्सपर्ट्सनुसार, जर कुणी निरोगी असेल तर त्यांचे डोळे पांढरे दिसतात. पण जर तुमचे डोळे पिवळे दिसत असतील तर पित्ताशय, यकृत, अग्नाशय किंवा पित्त नलिकांची समस्या असण्याचा संकेत आहे. लाल डोळेही आरोग्य खराब असल्याचा संकेत आहे.7 / 8नखांचा रंग - नखं बघूनही एक्सपर्ट तुमच्या आरोग्याबाबत सांगू शकतात. जर तुमचे हात किंवा पायांच्या नखांचा आकार, बनावट किंवा रंग नॉर्मल नसेल तर याचा अर्थ होतो की, तुमचं आरोग्य बरोबर नाही. कधी कधी धुम्रपान आणि काही नेल पॉलिश रंग सुद्धा नखांचा रंग पिवळा होण्याचं कारण ठरू शकता. पिवळा रंग म्हणजे ब्लड सर्कुलेशन योग्य न होणे आणि लिक्विडची कमतरता असणे आहे.8 / 8पोटात गॅस होणे - जर कुणाच्या पोटात सतत गॅस होत असेल तर याचं कारण म्हणजे व्यक्तीचं डायजेशन बरोबर नाही. जर कुणी दिवसातून १० ते २० वेळा गॅस पास करत असेल तर त्यांनी लगेच एक्सपर्ट्सना दाखवा. आणखी वाचा Subscribe to Notifications