World Liver Day : 7 liver detox drinks which will clean liver inside out
लिव्हरमधील कचरा बाहेर फेकतील हे खास ड्रिंक्स, लिव्हर कधीच होणार नाही खराब! By ऑनलाइन लोकमत | Published: April 19, 2024 11:52 AM1 / 9World Liver Day : लिव्हर हा शरीरातील सगळ्यात महत्वाच्या अवयवांपैकी एक आहे. याच्याही समस्या आजकाल लोकांना जास्त होत आहे. याला कारण त्यांच्याच काही चुका असतात. जर नियमितपणे लिव्हरची काळजी घेतली नाही तर याने जीवाला धोकाही होऊ शकतो. दरवर्षी जगभरात वर्ल्ड लिव्हर डे पाळला जातो. त्यानिमित्ताने आज आम्ही तुम्हाला लिव्हर स्वच्छ ठेवण्याच्या काही टिप्स सांगणार आहोत. 2 / 9शरीरातील रक्त शुद्ध करण्याची मोठी जबाबदारी लिव्हरवर असते. लिव्हर शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढतं. पण या कामात लिव्हरवर खूप जास्त दबाव तयार होतो आणि हळूहळू त्याचं काम कमजोर होतं. यामुळे फॅटी लिव्हर, फेलिअर आणि कॅन्सरही होऊ शकतो. अशात रिकाम्या पोटी काही ड्रिंक्स पिऊन तुम्ही लिव्हर स्वच्छ करू शकता. ज्याला लिव्हर डिटॉक्स म्हणतात.3 / 9आलं आणि लिंबाचा चहा - लिंबामध्ये अॅंटी-ऑक्सिडेंट तत्व असतात आणि आल्यामध्ये अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण. या दोन्ही गोष्टी लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढतात. तसेच लिव्हरवरील सूजही कमी केली जाते.4 / 9हळदीचं पाणी - सूज कमी करणारी हळद लिव्हरमधील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत करते. यात अॅंटी-इन्फ्लामेटरी गुण असतात, जे लिव्हर फेलिअर किंवा कॅन्सरपासून वाचवू शकतात. तुम्ही रोज हळद आणि आल्यापासून तयार पाण्याचं सेवन करू शकता.5 / 9बिटाचा रस - बीट हे लिव्हर डिटॉक्स करण्याच्या कामात येतं. हे शरीरातील सगळे विषारी पदार्थ एका झटक्यात बाहेर काढतं. रोज बिटाचा रस तुम्ही रिकाम्या पोटी प्यावा. याने फॅटी लिव्हर डिजीजपासूनही बचाव होतो.6 / 9आवळ्याचा रस - तुम्ही जर रिकाम्या पोटी आवळ्याचा रस प्याल तर याने खूप फायदे होतात. बॉडी डिटॉक्ससाठी आवळ्यात रस फार फायदेशीर असतो. तसेच याने त्वचा आणि केसांनाही अनेक फायदे होतात. लिव्हरच्या आजारांपासूनही बचाव होतो.7 / 9ब्रोकलीचा ज्यूस - लिव्हरसंबंधी समस्येपासून बचाव करण्यासाठी ब्रोकलीचा ज्यूस फार फायदेशीर मानला जातो. द जर्नल ऑफ न्यूट्रिशननुसार रोज ब्रोकलीचा ज्यूस प्यायल्याने लिव्हर डॅमेजही रोखलं जाऊ शकतं सोबतच फॅटी लिव्हरची समस्याही दूर करण्यास मदत मिळते.8 / 9गाजराचा ज्यूस - गाजरामध्ये व्हिटॅमिन ए भरपूर प्रमाणात असतं. हेच कारण आहे की, याला लिव्हरसाठी हेल्दी मानलं जातं. फॅटी लिव्हरची समस्या दूर करण्यासाठी याने खूप मदत मिळते. तसेच गाजराने आपल्या शरीरातील विषारी तत्व बाहेर पडतात आणि लिव्हर डॅमेजचा धोका कमी होतो.9 / 9लस्सी - लस्सीमध्ये प्रोटीन, कार्बोहाइड्रेट्स, व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी आणि फोलिक अॅसिड अधिक प्रमाणात आढळून येतं. त्यासोबतच लस्सीमध्ये कॅल्शियम, मॅग्नीशियम, फॉस्फोरस, पोटेशिअम आणि झिंकही असतं. लिव्हरसाठी लस्सी फार फायदेशीर असते. कारण यातील पोषक तत्व लिव्हरला हेल्दी ठेवण्यासाठी फायदेशीर असतात. दह्यात असलेलं प्रोबायोटिक्स नॉन अल्कोहोलिक फॅटी लिव्हर डिजीजला रोखण्याचं काम करतं. आणखी वाचा Subscribe to Notifications