शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

पिवळे दात चमकदार आणि निरोगी करण्याच्या खास टिप्स, आयुर्वेद डॉक्टरांनी सांगितल्या 5 जडीबुटी

By ऑनलाइन लोकमत | Published: March 20, 2023 11:59 AM

1 / 8
दरवर्षी 20 मार्चला वर्ल्ड ओरल हेल्थ डे (World Oral Health Day) पाळला जातो. हा दिवस पाळण्याचा उद्देश हा आहे की, लोकांमध्ये ओरल हेल्थबाबत जागरूकता पसरवणे. दरवेळी या दिवसाची थीम वेगवेगळी असते. यावर्षी 'Be Proud of Your Mouth' अशी थीम आहे.
2 / 8
बरेच लोक तोंडाच्या आरोग्याकडे फार दुर्लक्ष करतात. तोंडाच्या आरोग्याची काळजी घेणं तेवढंच गरजेचं आहे, जेवढी आपण शरीराची काळजी घेतो. असं केलं नाही तर दातांसंबंधी अनेक गंभीर समस्या होऊ शकतात. दातांच्या समस्यांबाबत सांगायचं तर दात पिवळे होणे, हिरड्यांमध्ये वेदना, दात दुखणे, पायरिया, किड लागणे, तोंडातून दुर्गंधी येणे आणि दात कमजोर होणे अशा समस्या होतात.
3 / 8
दात पिवळे होणं किंवा तोंडातून दुर्गंधी येणं तुमच्यासाठी लाजिरवाणं ठरू शकतं. अशात काही डॉक्टरांनी काही आयुर्वेदिक जडीबुटींच्या मदतीने दात चमकदार आणि निरोगी ठेवण्याच्या टिप्स दिल्या आहेत.
4 / 8
बाभळीची पाने - दात पांढरे करण्यासाठी आणि दातांची समस्या दूर करण्यासाठी बाभळी एक शक्तीशाली जडीबुटी आहे. या जडीबुटीमध्ये अॅंटी- मायक्रोबियल गुण असतात. बाभळीची पाने किंवा फांद्या चावल्याने अॅंटी-बॅक्टेरिअल एजंट रिलीज होतात. जे ओरल हेल्थसाठी फायदेशीर असतात. बाभळीच्या कोवळ्या फांद्यांचा टूथब्रशसारखा वापर करू शकता. बाभळीमध्ये आढळणारं टॅनिन दात चमकदार करतं.
5 / 8
वडाची फांदी - वडाच्या कोवळ्या फांदीचा तुम्ही टूथब्रशसारखा वापर करू शकता. या फांदीने दात घासले तर खूप फायदा होतो. याने दात केवळ चमकदारच नाही तर दात आणि हिरड्यांचं आरोग्यही चांगलं राहतं.
6 / 8
दात मजबूत करते तुळशी - तुळशीची काही पाने वाळवा, त्यांचं पावडर तयार करा आणि हे पावडर बोटाने दातांवर घासा. तुळशीच्या पानांमुळे दातांची चांगली स्वच्छता होते आणि दात चमकदार होतात. याने पायरिया म्हणजे हिरड्यातून रक्त येण्यासारखी समस्या दूर होते.
7 / 8
कडूलिंबाने होतो फायदा - दातांचा पिवळेपणा घालवायचा असेल आणि दात चमकदार करायचे असतील तर कडूलिंबाचं झाड एक पारंपारिक उपाय आहे. कडूलिंबाच्या फांद्यांच्या वापर आजही भारतात टूथब्रश म्हणून वापर करतात. कडूलिंबाच्या तेलामध्ये अॅंटी-सेप्टिक गुण असतात. ज्यामुळे तोंडाची दुर्गंधी दूर होते. दातांमधील कीटाणू दूर होतात आणि दातांना किड लागण्याची समस्या दूर होते.
8 / 8
त्रिफळा दूर करतो तोंडाची दुर्गंधी - दात पांढरे करण्यासाठी आणि तोंडाची दुर्गंधी दूर करण्यासाठी त्रिफळा फायदेशीर मानला जातो. याने तोंडातील फोडही दूर होतात. यासाठी त्रिफळा पाण्यात उकडून घ्या, हे पाणी जरा घट्ट झालं पाहिजे. ते थंड झाल्यावर या पाण्याने गुरळा करा.
टॅग्स :Health Tipsहेल्थ टिप्सHealthआरोग्य