World sleep day 2021 know the military secret to fall asleep fast
World sleep day 2021 : झोप येत नसेल तर या मिल्ट्री टेक्निकनं २ मिनिटात डाराडूर झोपाल; सैनिकसुद्धा वापरतात हा सोपा फंडा By ऑनलाइन लोकमत | Published: March 19, 2021 3:34 PM1 / 8दरवर्षी मार्च महिन्यात तिसऱ्या शुक्रवारी वर्ल्ड स्लीप डे साजरा केला जातो. लोकांची झोप आणि आरोग्याबाबत जागृती निर्माण करणं हे या दिवसाचं उद्दिष्ट असते. अनेकांना गादीवर पडल्या पडल्या लगेच झोप येते. तर काहींना मध्यरात्रीपर्यंत या कुशीवर त्या कुशीवर करत राहावं लागतं. तर काही लोक झोप येत नसल्यानं हातात मोबाईल घेतात. त्यामुळे अजिबातच झोप लागत नाही. आज आम्ही तुम्हाला लवकर झोप येण्यासाठी झोपेची मिलिट्री ट्रिक सांगणार आहोत2 / 8लवकर झोप येण्यासाठी सैनिक एका खास टेक्निकचा वापर करतात. यामुळे फक्त दोन मिनिटात झोप येते. ही ट्रीक यूएस आर्मीमधये वापरली जाते. युद्धादरम्यान जेव्हा सैनिक झोपायचा प्रयत्न करतात तेव्हा त्यांना झोप खूप कमी येते. 3 / 8रिलैक्स ऐंड विन : चैंपियन परफॉर्मेंस नावाच्या पुस्तकात या ट्रिकबाबत माहिती देण्यात आली आहे. १९८१ मध्ये हे पुस्तक प्रकाशित करण्यात आलं होतं. पण Joe.co.uk च्या वेबसाईटवर छापल्यानंतर संपूर्ण जगभरात ही ट्रिक प्रसिद्ध झाली. 4 / 8आर्मी प्रमुखांनी ही टेक्निक यासाठी बनवली होती. जेणेकरून थकव्यामुळे सैनिकांकडून चूक होऊ नये. त्यांना चांगली झोप लागावी यासाठी या ट्रीकचा वापर केला जातो.5 / 8यासाठी आपल्या तोंडाच्या मसल्सना रिलॅक्स करा. जीभ, जबडा,डोळे आणि आसपासच्या पेशींचा तणाव दूर करा. आपल्या खांद्यांला खाली खेचण्याचा प्रयत्न करा. श्वास बाहेर सोडा आणि छातीसह पायांनाही रिलॅक्स करा. १० सेकंदानंतर डोक्यात ज्या गोष्टी सुरू आहेत, ज्या काढून टाकण्याचा प्रयत्न करा. तुम्ही एखाद्या समुद्र किनारी, निळ्या आकाशाखाली झोपले आहात असा विचार करा. 6 / 8१० वेळा ही प्रक्रिया पुन्हा पुन्हा करत राहा. एका रिपोर्टनुसार ६ आठवड्यांपर्यंत ही ट्रीक वापल्यानंतर ९६ टक्के लोकांसाठी प्रभावी ठरल्याचं दिसून आलं आहे. 7 / 8फक्त आर्मीच नाही तर झोप न येण्याची समस्या अनेकांना सतावते. त्यामुळे कार्यक्षमतेवर वाईट परिणाम होतो. झोप व्यवस्थित पूर्ण न झाल्यानं डायबिटीस, हार्ट डिसीज आणि लक्ष केंद्रीत न होणं अशा समस्या उद्भवतात.8 / 8 झोप येण्यासाठी ३ गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. पहिली गोष्ट स्वच्छ बेडरूम, दुसरं शरीर रिलॅक्स ठेवायचं, तिसरं म्हणजे डोकंही शांत ठेवायचं. डोक्यात जर वेगवेगळे विचार सुरू असतील तर तुम्हाला कधीही झोप लागू शकणार नाही. आणखी वाचा Subscribe to Notifications