Worlds largest kidney stone removed from sri lankan man know can be avoided
जगातला सगळ्यात मोठा किडनी स्टोन, कसा तयार होतो अन् होऊ नये म्हणून काय घ्यावी काळजी? By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2023 2:10 PM1 / 9Guinness world records : किडनी स्टोन म्हटलं की, कुणाच्या पोटात गोळा येईल. कारण ही समस्या झाली तर इतक्या वेदना होताता की, सहन करणं अशक्य असतं. अशात जगातला सगळ्यात मोठा आणि जड किडनी स्टोन श्रीलंकेच्या सैन्य डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या शरीरातून काढला. या स्टोनची लांबी 5.26 इंच आणि वजन 801 ग्राम आहे. अशात किडनी स्टोन कसा तयार होतो हे तुम्हाला माहीत असलं पाहिजे.2 / 9श्रीलंकेच्या आर्मी डॉक्टरांनी एका व्यक्तीच्या किडनीतून आतापर्यंतचा सगळ्यात मोठा आणि सगळ्यात वजनी किडनी स्टोन काढून गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड नोंदवला आहे.3 / 9याआधी हा रेकॉर्ड भारत आणि पाकिस्तानच्या नावे होता. 2004 मध्ये भारतीय डॉक्टरांनी 13 सेंटीमीटर लांब किडनी स्टोन काढला होता. तर पाकिस्तानी डॉक्टरांनी 620 ग्रामचा किडनी स्टोन काढला होता.4 / 9मात्र, श्रीलंकेत काढण्यात आलेल्या एका किडनी स्टोनची लांबी 13.372 (5.26 इंच) सेंटीमीटर आहे. डॉक्टरांनी सांगितलं की, याचं वजन 801 ग्राम आहे.5 / 9ज्याच्या किडनीमधून हा स्टोन काढण्यात आला त्याचं नाव कोन्ज आहे. त्याच्या उजव्या किडनीमध्ये स्टोन होता. श्रीलंकेच्या कोलंबो आर्मी हॉस्पिटलमध्ये यूरोलॉजिकल टीम द्वारे त्याच्यावर उपचार करण्यात आले.6 / 9कसा तयार होतो किडनी स्टोन? - जेव्हा किडनीमधून जास्त कन्सट्रेट यूरिन होऊ लागते. तेव्हा लघवीमध्ये असलेले केमिकल्स किडनीच्या आत क्रिस्टलाइज्ड होऊ लागतात. नंतर ते स्टोनचं रूप घेतात.7 / 9कॅल्शिअमचे असतात स्टोन - किडनी स्टोन हे 80 टक्के कॅल्शिअमपासून बनलेले असतात आणि काही स्टोन हे कॅल्शिअम ऑक्सालेट किंवा कॅल्शिअम फॉस्फेटने तयार होतात.8 / 9कसा निघतो किडनी स्टोन? - जे स्टोन साइजमध्ये 3 मिलीमीटरपेक्षा जास्त असतात, त्यांना काढण्यासाठी सर्जरी करावी लागते. स्टोन तोडण्यासाठी साउंड वेव्ह किंवा छोट्या कटचा वापर केला जातो.9 / 9किडनी स्टोनपासून बचाव कसा करावा - किडनी स्टोनपासून वाचवण्यासाठी सोडिअमचं कमी प्रमाणात सेवन करावं. दररोज साधारण 2 ते 4 लीटर पाणी प्यायल्याने छोटे स्टोन लघवीद्वारे बाहेर काढण्यास मदत मिळते. आणखी वाचा Subscribe to Notifications