शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

'ही' आहेत पोटावर चरबी वाढण्याची कारणं, बारीक दिसायचं असेल तर वेळीच बदला 'या' सवयी

By ऑनलाइन लोकमत | Published: October 05, 2021 6:27 PM

1 / 6
जास्तीत जास्त लोक आज बेली फॅटच्या समस्येुमळे हैराण आहेत. बेली फॅट म्हणजे पोटावरील चरबी वाढण्याचं कारण लोक रिफाइंड शुगर आणि सॅच्युरेटेड फॅटला मानतात. पण मुळात आपल्या अनेक सवयींमुळे पोटावरील चरबी वाढते. या सवयींमुळे तुमचं पोट बाहेर निघतं. ज्याचा प्रभाव तुमच्या पर्सनॅलिटीवर पडतो. अशात जर तुम्हाला पोटावरील चरबी कमी करायची असेल तर या ५ सवयी वेळीच बदला.
2 / 6
शुगर ड्रिंक्स - जंक फूडसोबत सोडा किंवा कोल्ड ड्रिंक्सचं सेवन करत असाल तर हेच तुमच्या पोटावरील चरबी वाढण्याचं कारण आहे. एक रिसर्चनुसार, एक ग्लास सोडा किंवा कोल्ड ड्रिंकमद्ये ३९ ग्रॅमपर्यंत शुगर असते. याने तुमच्यावरील चरबी ७० टक्क्याने वाढू शकते.
3 / 6
खाण्याची वेळ आणि प्रमाण - जेवणाची योग्य वेळ आणि त्याचं प्रमाण यावरही लक्ष द्यायला हवं. अनेकदा गरजेपेक्षा जास्त जेवण आणि योग्य वेळेवर न जेवल्यानेही पोटावरील चरबी वाढते. एका रिसर्चनुसार, जर तुम्ही योग्य वेळेवर ब्रेकफास्ट करत असाल, याने डायबिटीससारख्या आजाराचा धोका कमी होतो. त्यामुळे जेवणाचं प्रमाण किती घेत आहात यावर लक्ष द्या.
4 / 6
उभं राहून पाणी पिणे - सतत उभं राहून पाणी प्यायल्यानेी बेली फॅट वाढू शकतं. आयुर्वेदानुसार, नेहमीच बसून पाणी प्यावं. पाणी पिताना कंबर सरळ ठेवा. याने पाणी तुमच्या मेंदूपर्यंत सहजपणे पोहोचतं आणि शरीर चांगल्या प्रकारे काम करेल. (Image Credit : Boldsky.com)
5 / 6
दुपारचं जेवण आणि डीनर स्कीप करू नये - अनेकदा लोक वजन कमी करण्यासाठी जेवणच करत नाही. पण वजन कमी करण्यासाठी जेवण सोडल्याने मेटाबॉलिज्म स्लो होतं आणि फॅट वाढण्याचं काम होतं. याने कॅलरी बर्न करण्याची क्षमता घटते आणि बेली फॅट वेगाने वाढतं.
6 / 6
प्रोबायोटिक्सची भूमिका - प्रोबायोटिक्समुळे पचन क्रिया चांगली राहते आणि पोटात चांगल्या बॅक्टेरियाचं प्रमाण वाढतं. जर डाएटमध्ये तुम्ही दह्याचा समावेश केला तर याने पोट फुगणे, सूज आणि पचनासंबंधी समस्या होणार नाही. दही खाल्ल्याने पोटात फॅट जमा होणार नाही. त्यामुळे दही खा.
टॅग्स :Weight Loss Tipsवेट लॉस टिप्सFitness Tipsफिटनेस टिप्सHealth Tipsहेल्थ टिप्स