You Should STOP Eating Biscuits
बिस्किटं आवडतात, मग हे नक्की वाचा By ऑनलाइन लोकमत | Published: June 28, 2019 2:40 PM1 / 8चहा-बिस्किट खाण्याची सवय अनेकांना असते. अनेकांना बिस्किटं खूप आवडतात. मात्र जास्त प्रमाणात बिस्किटं खाल्ल्यास शरीराचं नुकसान होऊ शकतं.2 / 8बिस्किटं तयार करण्यासाठी पाम तेलाचा वापर केला जातो. यामुळे हृदय विकार होण्याचा धोका असतो. 3 / 8बहुतांश बिस्किटं मैद्यापासून तयार केली जातात. मैद्यामुळे आतड्यांवर विपरित परिणाम होतो.4 / 8बिस्किटातील मैद्यामुळे वजन वाढतं. यासोबतच रक्तातील साखरेचं प्रमाणदेखील वाढतं. मैद्याचा समावेश असलेली बिस्किटं जास्त प्रमाणात खाल्ल्यास अपचनाचाही त्रास होतो. 5 / 8बिस्किटांमधील काही घटकांमुळे त्यांची चटक लागते. त्यामुळे व्यक्ती एका बिस्किटावर न थांबत नाही. त्यामुळे बिस्किटं खाण्याची सवय लागते. 6 / 8साधारणपणे 25 ग्रॅम बिस्किटामध्ये 0.4 ग्रॅम मीठ असतं. जास्त बिस्किटं खाल्ल्यास उच्च रक्तदाबाचा त्रास होऊ शकतो. 7 / 8बिस्किटं अधिक काळ टिकावीत यासाठी प्रिझर्व्हेटिव्स वापरली जातात. ती रक्तासाठी हानीकारक असतात. 8 / 8बिस्किटांमध्ये सोडियम बेन्झोएटचा वापर होतो. त्याचा डीएनएवर विपरित परिणाम होतो. आणखी वाचा Subscribe to Notifications