शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

या तरुणीला आहेत दोन प्रायव्हेट पार्ट आणि गर्भाशय, काय आहे 'हा' दुर्मिळ आजार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 02, 2021 7:09 PM

1 / 10
अमेरिकेतील पेनसिल्वेनियामधील फिलाडेल्फिया येथे राहणाऱ्या २० वर्षीय पैग डीएंजेलो या तरुणीला दुर्धर आजाराचा सामना करावा लागत आहे. या आजाराला यूट्रेस डिडेलफिस असे म्हटले जाते. यामध्ये रुग्णाला दोन प्रजनन प्रणाली (Double Reproductive System) असते. अशा महिलेमध्ये दोन योनी, दोन गर्भाशय आणि दोन गर्भाशय ग्रीवा असतात.
2 / 10
डेली मेलमध्ये लिहिल्याप्रमाणे या आजारामुळे या तरुणीला फार त्रास सहन करावा लागतो. तिच्या शरीरात दोन प्रजनन प्रणाली असल्याने तिला दोनदा मासिक पाळी येते. डीएंजेलोला ती गर्भवती असल्याचे तो पर्यंत कळणार नाही जो पर्यंत तिला मासिक पाळी थांबण्याशिवाय अन्य लक्षणे दिसत नाहीत.
3 / 10
रिपोर्टनुसार ही तरुणी दोन्ही गर्भाशयांमध्ये गर्भवती होऊ शकते कारण तीची दोन्ही गर्भाशये योग्य रितीने काम करत आहेत.
4 / 10
या आजारात जास्तवेळा महिलांना गर्भपाताचा सामना करावा लागतो.
5 / 10
पैग डिएंजेलोला १८ वर्षापर्यंत या गोष्टीची जाणीव नव्हती. ज्यावेळी ती तिची मासिक पाळी अनियमित असल्याची तक्रार घेऊन स्त्रीरोग तज्ज्ञाकडे गेली तेव्हा तिला हे समजले.
6 / 10
डीएंजेलोला कधी कधी १५ दिवसातच मासिक पाळी येते.
7 / 10
पैग डिएंजेलो सांगते की, जेव्हा मी लोकांना माझ्या स्थीतीबद्दल सांगते तेव्हा ते आश्चर्यचकित होतात. त्यांना वाटतं की दोन योनी असल्यावर ते तिच्या शरीराच्या बाहेरच्या भागावर दिसून येतात. पण असं नाहीये हे त्यांना समजंवाव लागतं.
8 / 10
डिएंजेलो लोकांना सांगते की असं असतं तर ते कळालं असतं. तिलाही ही हे एमआरआय केल्यानंतर समजलं.
9 / 10
डिएंजलो सांगते की, ती फेसबुक आणि टिकटॉकद्वारे या आजाराचा सामना करण्याऱ्या मुलींच्या संपर्कात आहे.
10 / 10
पैग डिएंजेलो म्हणते, माझ्या सेक्ललाईफबद्दलही अनेक प्रश्न उपस्थित केले गेले. पण तिने सांगितले की यामुळे तिच्या सेक्स लाईफमध्ये काहीही अडचण येत नाही.
टॅग्स :Healthआरोग्य