शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

तुम्हाला कोणतं चॉकलेट पसंत आहे? यावरुन जाणून घ्या तुमचं व्यक्तिमत्व

By ऑनलाइन लोकमत | Published: September 27, 2018 10:32 AM

1 / 7
चॉकलेट न आवडणारा व्यक्ती क्वचितच बघायला मिळतात. पण प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा व्यक्ती नक्की असतो जो चॉकलेट्सबाबत क्रेझी असतो. खासकरुन मुली चॉकलेटबाबत क्रेझी असतात. त्यांना वेगवेगळ्या प्रकारच्या चॉकलेट्स आवडतात. पण वेगवेगळ्या सर्वेनुसार, तुमच्या चॉकलेटच्या पसंतीवरुनही तुमच्या व्यक्तिमत्वाबाबत खुलासा केला जाऊ शकतो.
2 / 7
चॉकलेटचा कोणता फ्लेवर तुम्हाला पसंत आहे, यावरुन स्वभावाशी निगडीत अनेक गोष्टींचा खुलासा करता येतो असे मानले जाते. मग तुम्हाला कसं चॉकलेट आवडतं? तुम्ही मिल्क चॉकलेट जास्त खाता कि डार्क चॉकलेट? चला जाणून घेऊ याबाबत काही खास गोष्टी....
3 / 7
जर तुम्हाला मिल्क चॉकलेट पसंत असेल तर स्वभावाने तुम्ही फ्रेन्डली प्रकारचे व्यक्ती असाल. एकतर तुमचा मित्र परिवार खूप मोठा असेल आणि तसे नसेल तक जितके आहेत त्यांच्याशी तुमची चांगली मैत्री असेल. असेही मानले जाते की हे चॉकलेट आवडणाऱ्या लोकांना साध्या गोष्टी फार आवडतात आणि त्यांना दिखावा करणे नापसंत असतं.
4 / 7
डार्क चॉकलेट पसंत करणाऱ्या लोकांना मॅच्युअर समजलं जातं. दुसऱ्यांची काळजी घेणे आणि स्वत:चं लाइफ समूजतदारपणे जगणे, लाइफ जगत असताना काही नियम पाळणे हे असतं. या लोकांना नवनवीन गोष्टी ट्राय करणे पसंत असतं, असं मानलं जातं.
5 / 7
प्लेन किंवा कॅरामेल असलेलं चॉकलेट पसंत करणारे लोक स्वभावाने चंचल असतात. लाइफ आपल्या पद्धतीने जगणं त्यांना पसंत असतं. ही लोकं कुणाला दु:खी पाहू शकत नाहीत आणि दु:खी व्यक्तींची ते शक्य ती मदत करण्याचा प्रयत्न करतात.
6 / 7
जर तुम्हाला व्हाइट चॉकलेट पसंत असेल तर आजूबाजूला असलेल्या लोकांपेक्षा तुमचं स्वभाव फार वेगळा असेल. कोणत्याही परिस्थितीमध्ये तुम्हाला काय वाटतं केवळ याच हिशोबाने निर्णय घेता. अशा लोकांना दुसरे काय विचार करतात याचा काहीही फरक पडत नाही. हे लोक केवळ आपल्या मनाचं ऐकतात असं सांगितलं जातं.
7 / 7
हॉट चॉकलेट हा प्रकारही आजकाल चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. असे म्हणतात की, हॉट चॉकलेट आवडणाऱ्या लोकांना छोट्या छोट्या गोष्टींमध्ये आनंद शोधणं आवडतं. आणि दुसऱ्यांना कसं आनंदी ठेवायचं हेही त्यांना माहीत असतं असं मानलं जातं.
टॅग्स :Personalityव्यक्तिमत्वrelationshipरिलेशनशिप