शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

राहुल गांधींच्या स्वागताला अंथरली फुले, बंजारा नृत्य अन् 'भारत जोडो'चा नारा

By ऑनलाइन लोकमत | Published: November 15, 2022 8:41 AM

1 / 10
काँग्रेस नेते खासदार राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली कन्याकुमारीपासून सुरू झालेली ‘भारत जोडो’ यात्रा मंगळवार, १५ नोव्हेंबर रोजी सकाळी ७ वाजून ५ मिनिटांनी मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातून वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या पैनगंगा नदीच्या पुलावर विदर्भात दाखल झाली.
2 / 10
यावेळी भारत जोडोच्या घोषणा देण्यात आल्यात . राहुल गांधी यांची एक झलक पाहण्यासाठी हजारो नागरिक पदयात्रेत दाखल झाले होते. पैनगंगा नदी पूलाजवळ वाशिम जिल्ह्याच्या सिमेवर उभारलेल्या भव्य स्वागतव्दारात मोठ्या थाटात पदयात्रेचे स्वागत करण्यात आले.
3 / 10
राहूल गांधी यांच्या भारत जोडो यात्राचे वाशीम जिल्ह्यात आगमन होताच बंजारा समाजात प्रसिद्ध असलेल्या पारंपरिक लेंगि नृत्य करून डफडी वाजवून स्वागत करण्यात आले.
4 / 10
हे लेंगी पथक मानोरा तालुक्यातील विविध तांड्यामधील आहे. वाशिम जिल्ह्यातील गव्हा, आसोला, फुलउमरी आदी गावातील हे पथक आहे. यावेळी पथकातील बंजारा समाज बांधवांनी आपला पारंपारिक पेहराव परिधान करून फेटे धारण केले होते .
5 / 10
बंजारा नृत्यव्दारे त्यांनी बंजारा संस्कृतीचे दर्शन घडवून आणले . राहुल गांधी यांनी बंजारा नृत्य करणाऱ्या बंजारा समाज बांधवांना हात दाखवून त्यांचा उत्साह वाढविला .
6 / 10
भारत जोडो पदयात्रेमध्ये तोंडगाव फाट्यानजीक पोहोचल्यानंतर येथे तोंडगाव येथील रहिवाशांनी रस्त्याच्या दुतर्फा फुले टाकून राहुल गांधी यांचे आगळे वेगळे स्वागत केले .
7 / 10
यावेळी विशेषतः महिलांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. तसेच येथे डफलीच्या तालावर काही लोकांनी नृत्य सादर केले. काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी बैलबंडीवर तुरीचे झाडे घेऊन राहुल गांधी यांचे लक्ष वेधले होते.
8 / 10
येथे पदयात्रेत सहभागी असणाऱ्या नागरिकांकरिता चहा नाश्त्याची व्यवस्था सुद्धा करण्यात आली होती. थोड्या अंतरावर गेल्यानंतर राहुल गांधी यांनी एका हॉटेलमध्ये चहा घेतला.
9 / 10
दरम्यान, हिंगोली-वाशिम जिल्हा सिमेवर असलेल्या राजगाव गावानजीक पैनगंगा नदी पुलाजवळ लालकिल्ल्याच्या प्रतिकृतीत भव्य स्वागतद्वार उभारणी वाशिम येथील कलाकारांनी केली.
10 / 10
यावेळी पहाटे ६ वाजतापासून नागरिकांनी गर्दी केली होती . यावेळी देशभक्तीपर गिताने वातावरण भारावून टाकले होते . यावेळी अमरावती येथील रामराज्य ढोलताशा ध्वजपथकाने ढोल वाजवून राहुल गांधी यांचे स्वागत केले.
टॅग्स :Rahul Gandhiराहुल गांधीwashimवाशिमBharat Jodo Yatraभारत जोडो यात्रा