Siddheshwar Dam is one hundred percent full; Visargas begins with six doors open
सिद्धेश्वर धरण शंभर टक्के भरले; सहा दरवाजे उघडून विसर्गास सुरुवात By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2021 7:35 PM1 / 7औंढा नागनाथ तालुक्यातील सिद्धेश्वर येथे पूर्णा नदीवर सिद्धेश्वर धरण आहे. 2 / 7धरण क्षेत्रात मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसामुळे आवक वाढली. यामुळे धरण 100% क्षमतेने भरले. 3 / 7तसेच धरणामध्ये मोठ्या प्रमाणात आवक होत आहे. यामुळे प्रशासनाने धरणातून पाण्याचा विसर्ग करण्याचा निर्णय घेतला. 4 / 7धरणाच्या १४ गेट पैकी 6 गेटचे दरवाजे एक फूट उंचीने उघडण्यात आले. 5 / 7याद्वारे पूर्णा नदी पात्रात चार हजार 368 व क्युसेस पाणी विसर्ग केला जात आहे. धरणाचे दरवाजे बुधवारी सकाळी ९ वाजता उघडण्यात आले आहेत. 6 / 7त्यापूर्वी मंगळवारी पूर्ण प्रकल्प भागातील नदीकाठच्या हिंगोली,परभणी जिल्ह्यातील ३० गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला होता. 7 / 7सध्या सहा दरवाज्यातून विसर्ग सुरु असून. पाऊस अधिक व्होऊन आवक वाढल्यास धरणाचे आणखी दरवाजे उघडले जाणार असल्याची माहिती अभियंता भूषण कनोज यांनी दिली आहे. आणखी वाचा Subscribe to Notifications