शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

शेळीपालनातून ३६ वर्षीय मराठी युवकानं केली कोटींची कमाई; वाचा यशस्वी संघर्षगाथा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 12, 2023 8:52 PM

1 / 10
देशातील विविध भागातील शेतकरी आपले उत्पन्न वाढविण्यासाठी अनेक प्रकारची कामे करत आहेत. आज आम्ही तुम्हाला पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील एका युवकाबाबत सांगत आहोत, ज्याने वयाच्या ३६ व्या वर्षी शेळीपालनातून करोडो रुपये कमाई केली.
2 / 10
मांसासाठी पाळलेल्या शेळ्यांचा व्यवसाय सुरू करण्यासाठी या पुण्यातील तरुणाने वैयक्तिक कर्ज घेऊन कामाला सुरुवात केली. पोल्ट्री किंवा दुग्ध व्यवसायात तुमच्या उत्पादनाची वेळेवर विक्री झाली नाही तर तुमचे नुकसान होऊ शकते, पण शेळीपालनात उत्पादन वेळेवर विकले नाही तरी तुमचे नुकसान होत नाही, पण नफा मिळत राहतो, असे युवकाने सांगितले.
3 / 10
या मराठी तरुणाने सांगितले की, शेळी वेळेवर विकली नाही आणि एक महिन्यानंतर विकली तर त्याची किंमत वाढली जाते. शेळीपालन सुरू करण्यासाठी युवकाने १० लाखांचे वैयक्तिक कर्ज घेतले आणि त्यानंतर शेळीपालन सुरू केले.
4 / 10
सरकारी नोकरी असलेल्या कुटुंबात जन्मलेल्या या तरुणाने १५ वर्षांपासून शेळीपालनाचा व्यवसाय करत आहे. शेळीपालनाच्या या व्यवसायात जवळपास १० वेळा असे प्रसंग आले की आता शेळीपालनाचा व्यवसाय बंद करावा असं वाटले. पण युवकाने हार मानली नाही आणि शेळीपालनाचा व्यवसाय सुरू ठेवला.
5 / 10
या युवकाचे नाव निलेश जाधव आहे. या तरुणाने पुण्यातील दौंडमध्ये शेळीपालन सुरू केले आहे. कपिला कृष्ण शेळी फार्मच्या कामकाजाची सुरुवात २०० उस्मानाबादी शेळ्यांनी झाली. बोअर शेळ्यांचा प्रजनन काळ ऑगस्ट ते डिसेंबर हा असतो. बोअर शेळ्यांमध्ये मध्यम आकाराच्या शेळ्यांनाही प्राधान्य दिले जाते.
6 / 10
शेळीचे कोकरू निरोगी पद्धतीने जन्माला आले आणि त्याची योग्य काळजी घेतली तर त्याच्या शुक्राणूंची गुणवत्ता चांगली येते आणि पुढे त्याच्या मांसाची गुणवत्ताही चांगली असते. सुरुवातीपासूनच चांगली जात घेतली पाहिजे आणि त्याचे योग्य पालनपोषण केले पाहिजे असं निलेश म्हणतो
7 / 10
शेळीचे मांस हजार रुपये प्रतिकिलो दराने विकायचे असेल, तर शेळीपालन आणि त्याच्या नियोजनाकडे अधिक लक्ष द्यावे लागेल. शेळीपालन करणाऱ्या लोकांनी चांगली जीन्स ब्रीड घेऊन त्यावर मेहनत घ्यावी, कारण यातून तुम्हाला चांगले पैसे मिळू शकतात.
8 / 10
२ ते अडीच महिन्यांत २० किलो बकरी बनवण्यासाठी आणि त्यातून ₹ २ लाख कमवायचे असेल तर तुम्हाला त्यावर गुंतवणूक करावी लागेल. सध्या निलेशच्या फार्ममध्ये सुमारे ₹ ६-७ कोटींच्या शेळ्या आहेत.
9 / 10
जिथे बाजारात मटण ₹ ६००-७०० किलोने विकले जाते, तिथे आम्ही मटण १००० रुपये किलोपर्यंत विकतो.राष्ट्रीय महामार्गापासून दीड किलोमीटर अंतरावर निलेश जाधव यांनी त्यांचे गोट फार्म सुरू केले.
10 / 10
गोट फार्मबाबत निलेश म्हणतो की, सुरुवातीला लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी १ ते २ वर्षे लागतील, त्यामुळे एवढा विचार करूनच कामाला सुरुवात करावी. लोकांना कळायला लागलं की, त्यानंतर ग्राहक स्वतः तुमच्यापर्यंत पोहोचू लागतात.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी