शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

नेटफ्लिक्स, प्राईमवर टाईमपास, दिवसाला ४ तास अभ्यास; तरीही NEETमध्ये पहिल्या नंबरानं पास

By ऑनलाइन लोकमत | Published: November 05, 2021 4:13 PM

1 / 8
नुकत्याच लागलेल्या नीट परिक्षेच्या निकालात हैदराबादचा मृणाल कुट्टेरी देशात पहिला आला. ७२० पैकी ७२० गुण मिळवत मृणालनं पहिला क्रमांक पटकावला. विशेष म्हणजे कोणतंही कठोर वेळापत्रक न पाळता, अभ्यासाचा कोणताही ताण न घेता मृणालनं नेत्रदीपक यश मिळवलं.
2 / 8
मृणालला आठवी, नववीत असल्यापासूनच बायोलॉजी आणि केमिस्ट्रीची आवड होती. नीटची तयारी त्यानं साडे तीन वर्षांपासून सुरू केली. मृणालला डॉक्टर व्हायचं आहे. त्याच्या कुटुंबातला कोणताही जवळचा नातेवाईक डॉक्टर नाही.
3 / 8
नीट परिक्षेची तयारी करताना अनेक विद्यार्थी स्वत:साठी वेळापत्रक तयार करतात. दिवसातून १५ तास अभ्यास करतात. आपले सगळे छंद बाजूला ठेवून विद्यार्थी अक्षरश: स्वत:ला अभ्यासात बुडवून घेतात. मृणालनं यातलं काहीच केलं नाही.
4 / 8
लॉकडाऊनमध्ये मृणालनं बराच वेळ मौजमजेत घालवला. त्या कालावधीत अभ्यासाकडे दुर्लक्ष झालं. मात्र त्यानं अभ्यासासाठी कधीच वेळापत्रक तयार केलं नाही. मला वेळापत्रकानुसार अभ्यास करणं जमत नाही. त्यामुळे वेळापत्रक तयार करण्यात तरी वेळ का घालावा, असा विचार मी केला, असं मृणालनं सांगितलं.
5 / 8
मी विशिष्ट लक्ष्य ठेवून अभ्यास करायचो. बऱ्याचदा लक्ष्य साध्य झालं नाही. मात्र मी कधीच त्याचा ताण घेतला नाही. रोज इतके तास अभ्यास व्हायलाच हवा, असं काहीच ठरवलं नाही. मी दिवसाला सरासरी ४ तास अभ्यास केला. कधीतरी ५ तास झाला असेल. पण त्यापेक्षा जास्त नाही, असं मृणाल म्हणाला.
6 / 8
हवा तेव्हा हवा तितका अभ्यास आणि अभ्यासाची इच्छा नसेल तेव्हा इतर मौजमजा, असा मृणालचा फंडा. नीटची तयारी करणारे अनेक जण छंद वगैरे सोडून देतात. मृणालनं तेही केलं नाही. नेटफ्लिक्स, प्राईमवरील टीव्ही शोजदेखील त्यानं पाहिलं आणि अभ्यासही केला.
7 / 8
मृणालला गाणी ऐकायलादेखील आवडतात. सकारात्मक ऊर्जा देणारी गाणी मृणालनं आवर्जून ऐकली. माझ्या यशात गाण्यांचा, संगिताचा मोलाचा वाटा आहे, असं मृणाल सांगतो. माझ्या प्लेलिस्टमध्ये विविध भाषांमधील गाणी आहेत. काही रशियन गाण्यांमधील शब्दांचे उच्चारदेखील मला कळत नाही. पण ऐकायला आवडतात, असं मृणालनं सांगितलं.
8 / 8
वेळापत्रकानुसार अभ्यास केल्यावरच अभ्यास होतो. त्यानेच यश मिळतं, असं अनेकांना वाटतं. मात्र हा जुना विचार झाला. मी वेगळ्या पद्धतीनं तयारी केली. इच्छा असेल तेव्हाच अभ्यास केला. पण मला याबद्दल कोणीच काही बोललं नाही. घरातल्या सगळ्याच सदस्यांनी मला पूर्ण मोकळीक दिली होती, हे सांगायला मृणाल विसरला नाही.
टॅग्स :NEET EXAM Resultनीट परीक्षेचा निकाल