शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

मुलाच्या शिक्षणासाठी वडिलांनी घर विकलं अन् पेट्रोल पंपावर नोकरी केली; २३ वर्षीय प्रदीप बनला IAS

By ऑनलाइन लोकमत | Published: August 02, 2021 11:12 AM

1 / 10
बिहारच्या गोपालगंजमध्ये राहणाऱ्या प्रदीप सिंह(Pradeep Singh) नं २०२० मध्ये वयाच्या २३ व्या वर्षी UPSC परीक्षा पास कर आयएएस अधिकारी(IAS Officer) बनला आहे. घरची आर्थिक परिस्थिती बिकट असताना त्याने कष्टानं यश मिळवलं आहे.
2 / 10
प्रदीपच्या शिक्षणासाठी त्याच्या वडिलांना राहतं घर विकायला लागलं.अलीकडेच एस्पिरेंट नावाची वेबसिरीज आली होती. यात यूपीएससीची तयारी करणाऱ्या तीन मित्रांची कहाणी दाखवली आहे. अशीच काही कहाणी आम्ही तुम्हाला सांगतोय. ज्यात अनेक अडचणींचा सामना करून यूपीएससीत घवघवीत यश संपादन केलं आहे.
3 / 10
प्रदीप सिंह मूळ बिहारमधील तरूण...मात्र त्याचं कुटुंब मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये राहतं. लहानपणापासून प्रदीप शिक्षणात तरबेज होता. प्रदीपनं त्याच्या शिक्षणाची सुरुवात इंदूरमधूनच केली आहे.
4 / 10
प्रदीप सिंहच्या घरची आर्थिक परिस्थिती हालाखीची होती. १२ वी नंतर प्रदीपनं यूपीएससीच्या तयारीसाठी दिल्लीला जाण्याचा निर्णय घेतला. प्रदीपचे वडील पेट्रोल पंपावर काम करत होते. त्यांच्याकडे मुलगा प्रदीपला दिल्लीला पाठवण्यासाठीही पैसे नव्हते.
5 / 10
प्रदीपनं खूप शिकावं असं त्याच्या वडिलांची इच्छा होती. त्यासाठी वडिलांनी प्रदीपच्या शिक्षणासाठी स्वत:चं घरही विकून टाकलं. १२ वीच्या बोर्डाच्या परिक्षेनंतर प्रदीप सिंह यूपीएससी परीक्षांच्या तयारीसाठी दिल्लीला राहायला गेला.
6 / 10
आपल्या शिक्षणासाठी वडिलांना घर विकावं लागलं त्यामुळे प्रदीप खूप तणावात होता. त्यामुळे यूपीएससी परीक्षा कुठल्याही परिस्थितीत पास होण्याचं ध्येय प्रदीपनं आखलं. UPSC पास करून अधिकारी व्हायच हा निश्चय प्रदीपनं मनात ठरवला.
7 / 10
प्रदीपनं अधिकारी व्हावं अशी त्याच्या संपूर्ण कुटुंबाची इच्छा होती. प्रदीप सिंहने २०१८ रोजी पहिल्यांदा UPSC परीक्षा दिली. पहिल्याच प्रयत्नात प्रदीपनं ऑल इंडिया रँकींगमध्ये ९३ व्या क्रमांकावर झेप घेतली. परंतु IAS साठी त्याची निवड झाली नाही.
8 / 10
परीक्षेत यशस्वी झाल्यानंतर प्रदीपची नियुक्ती इंडियन रेवेन्यू सर्व्हिस(IRS) मध्ये झालं. २०१८ मध्ये प्रदीप सिंहने यूपीएससी परीक्षा दिली परंतु आयएएस होण्याची संधी अवघ्या एका रँकने हुकली. त्यामुळे प्रदीपकडे आयपीएस बनण्याचा पर्याय होता.
9 / 10
परंतु प्रदीपनं फॉरेन्स सर्व्हिस ज्वाईन केलं. त्यानंतर सुट्टी घेतली आणि पुन्हा नव्या जोमाने तयारीला लागला. एका रँकने आयएएसची संधी गमावल्यानंतर प्रदीप सिंह खूप मानसिक दडपणाखाली होता. परंतु त्याने जिद्द सोडली नाही पराभव मान्य केला नाही.
10 / 10
एका वर्षाच्या तयारीनंतर प्रदीपनं पुन्हा यूपीएससी परीक्षा दिली आणि ऑल इंडिया रँकींगमध्ये ९३ हून थेट २६ व्या क्रमांकापर्यंत मजल मारली. त्यानंतर प्रदीप सिंहचं आयएएस अधिकारी होण्याचं स्वप्न पूर्ण झालं. IAS अधिकारी म्हणून प्रदीपची नियुक्ती झाली.
टॅग्स :upscकेंद्रीय लोकसेवा आयोग