शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

यूपीच्या मुलीला Google नं दिलं ५६ लाखांचं पॅकेज; ३२ लाखांची नोकरी सोडली

By ऑनलाइन लोकमत | Published: October 21, 2023 5:07 PM

1 / 10
आज आम्ही तुम्हाला एका अशा मुलीबद्दल सांगणार आहोत, जिने यूपीमधील एका छोट्या गावातून असा पराक्रम केला की आज तिच्या कुटुंबाला, तिच्या गावाला आणि संपूर्ण देशाला तिचा अभिमान आहे.
2 / 10
उत्तर प्रदेशातील मगर भागातील गोठवा गावातील रहिवासी असलेल्या आराध्या त्रिपाठीबद्दल बोलत आहोत, जिने गोरखपूरच्या मदन मोहन मालवीय तंत्रज्ञान विद्यापीठातून (एमएमएमयूटी) शिक्षण घेतले आहे
3 / 10
अभ्यासानंतर आराध्याला स्केलर कंपनीकडून ३२ लाख रुपयांची नोकरी ऑफर करण्यात आली होती, परंतु तिने ही ऑफर नाकारली आणि आता Google कडून ५६ लाख रुपयांची पॅकेज ऑफर स्वीकारली.
4 / 10
Google कडून MMMUTच्‍या माजी विद्यार्थ्याला मिळालेले ५६ लाख रुपयांचे हे सर्वात मोठे पॅकेज आहे. वडील वकील आणि गृहिणी आईच्या पोटी जन्मलेल्या आराध्या त्रिपाठीने लहानपणापासूनच शैक्षणिक पराक्रम दाखवायला सुरुवात केली.
5 / 10
सेंट जोसेफ शाळेत माध्यमिक शिक्षण पूर्ण केल्यानंतर, त्यांनी संगणक अभियांत्रिकीमध्ये बीटेक करण्यासाठी MMMUT मध्ये प्रवेश घेतला. आराध्याला तंत्रज्ञानाविषयी खूप आवड होती. त्यामुळे अगदी लहान वयातच तिने तांत्रिक क्षेत्रात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले आहे.
6 / 10
सॉफ्टवेअर अभियंता म्हणून स्केलरमधील तिचा प्रवास खूप यशस्वी ठरला. आराध्याला स्केलर येथे तिच्या उच्च-श्रेणीच्या कामगिरीसाठी ३२ लाख रुपयांचं सॅलरी पॅकेज मिळाले, परंतु यामुळे तिच्यासाठी आणखी मोठ्या संधींचा मार्ग मोकळा झाला.
7 / 10
आराध्याने आता टेक जायंट कंपनी Google कडून एक मोठी ऑफर स्वीकारली आहे. तिने केवळ कॉलेजवरच नव्हे तर संपूर्ण तांत्रिक क्षेत्रावर आपली छाप सोडली आहे आणि Google मध्ये सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट इंजिनिअर म्हणून सर्वाधिक मागणी असलेले पद मिळवले आहे.
8 / 10
लाइव्ह प्रोडक्शन ट्रॅफिक हाताळण्यासाठी आणि अशा कठीण स्पर्धात्मक वातावरणात उत्पादन वाढवण्यासाठी तिचे व्यावहारिक ज्ञान खूप उपयुक्त होते.
9 / 10
LinkedIn वर तिने तिच्या कौशल्याविषयी विस्तारात लिहिलं आहे. तिच्याकडे React.JS, React Redux, NextJs, Typescript, NodeJs, MongoDb, ExpressJS आणि SCSS सारख्या अनेक तंत्रज्ञान स्टॅकवर मजबूत पकड आणि अनुभव आहे.
10 / 10
डेटा स्ट्रक्चर्स आणि अल्गोरिदममध्ये मला खूप रस आहे त्याचसोबत विविध कोडिंग प्लॅटफॉर्मवर सुमारे 1000+ प्रश्न सोडवले आहेत आणि त्यांना चांगले रेटिंग मिळाले आहे. असं आराध्याने लिहिलं आहे.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी