शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

स्वप्नपूर्ती! फूटपाथवर राहणारी आसमा शेख आठवतेय का?; आता दक्षिण मुंबईत १ BHK फ्लॅटमध्ये राहतेय

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2021 1:38 PM

1 / 10
२०२० मध्ये जगात लोकांनी खूप काही पाहिलं. लॉकडाऊन, सोशल डिस्टेंसिंग हे शब्द आपल्या आयुष्याला जोडले. कोविड १९ मुळे जगातील लाखो लोकांचे आयुष्य बदलून टाकले. मुंबईतील आसमा शेख हीदेखील त्याचाच एक भाग. वडील ज्यूस विक्री करायचे ते लॉकडाऊनमध्ये बंद पडल्याने त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली.
2 / 10
मागील वर्षी आसमा शेखच्या आयुष्यात जे काही घडलं त्यामुळे तिने तिच्या शिक्षणावर परिणाम होऊ दिला नाही. कुटुंब फूटपाथवर आलं परंतु आसमानं शिक्षण सोडलं नाही. फूटपाथवर बसूनच तिने १० वीच्या परीक्षांची तयारी केली. शाळा-कॉलेज बंद असताना तिची शिकण्याची जिद्द कमी झाली नाही.
3 / 10
दहावीच्या परीक्षेत पास झाल्यानंतर केवळ भारतातच नाही तर संपूर्ण जगात तिची कहानी पोहचली. लोकांनी तिच्या या जिद्दीचं कौतुक केले. या मुलीनं अत्यंत हालाखीच्या परिस्थितीवर मात करत ४० टक्क्यांनी दहावीत पास झाली. आसमाची ही कहानी समोर येताच तिला मदत करण्याची मोहीम सुरू झाली.
4 / 10
ही मोहीम आता दिसू लागली आहे. आसमा आणि तिच्या कुटुंबाला दक्षिण मुंबईत मोहम्मद अली रोडवर ३ वर्षासाठी १ बीएचके फ्लॅट राहण्यास मिळाला आहे. तसेच मुंबईतील प्रतिष्ठीत केसी कॉलेजमध्ये आसमा शेखला प्रवेश मिळून तिथे तिचं शिक्षण सुरू झालं आहे.
5 / 10
आसमाला मदत करण्याच्या मोहिमेची सुरुवात स्पेनच्या जर्मन फर्नांडेसने केली. आसामाची कहानी त्यांनी लोकांसमोर आणली. त्यानंतर आसमासाठी मदतीचा ओघ सुरू झाला. दीड लाख रुपये लोकांनी मदत केली. त्याचसोबत मुंबईतील एका NGO ने तिच्या शिक्षणासाठी दर महिन्याला ३ हजार रुपये दिले जातात.
6 / 10
गेल्या आठवड्यात आसमा आणि तिचं कुटुंब या फ्लॅटमध्ये राहण्यास गेले आहे. ३ वर्षासाठी तिला हा फ्लॅट मिळाला आहे. मी सध्या खूप आनंदी आहे. मला माझं शिक्षण पूर्ण करायचं आहे. माझं स्वप्न पूर्ण होत आहे असं आसमा शेखनं म्हटलं आहे. TOI नं आसमाची विशेष मुलाखत घेतली.
7 / 10
दहावी परीक्षेच्या निकालानंतर आसमा शेख प्रसिद्धीझोतात आली. तत्पूर्वी आसमा शेख आणि तिचं कुटुंब प्लास्टिक शेड बनवलेल्या झोपडीत राहत होते. दहावीच्या परीक्षेत तिला ४० टक्के मार्क मिळाले. तिचा संघर्ष पाहिला तर हे ४० टक्केही ९० टक्क्यांहून अधिक असल्याचं तिच्या हसऱ्या चेहऱ्यावरुन तुम्हालाही समजेल.
8 / 10
आसमानं शिक्षण घेण्यासाठी आयुष्यात प्रचंड मेहनत घेतली आहे. अभ्यास करण्यासाठी तिने रस्त्यावरील स्ट्रीट लाइटचा वापर केला आहे. रात्रीच्या वेळी गर्दी कमी असल्याने जास्तीत जास्त वेळ रात्रीचा अभ्यास करण्यावर भर दिला.
9 / 10
मला जे मार्क्स मिळाले आहेत त्यापेक्षा अधिकची अपेक्षा केली होती, ४० टक्क्यांहून जास्त गुण मिळतील असं तिला वाटत होतं. पण जे गुण मिळाले त्यातही ती आनंदी आहे. यापुढील शिक्षण तिला आर्टस या विषयात घेण्याची इच्छा होती असं आसमानं सांगितले होते. सध्या ती केसी कॉलेजमध्ये बारावीत आर्टसचं शिक्षण घेत आहे.
10 / 10
परदेशी लोकांनी तिच्या मदतीसाठी दीड लाख रुपये गोळा करत तिला फ्लॅट ३ वर्षासाठी दिला आहे. त्यात बेसिक सुविधा भाडे, लाइट बिल, घरखर्च यावर खर्च केला जाणार आहे. सोशल मीडियावरुन आसमा शेखची कहानी जगासमोर आली आणि तिचं संपूर्ण आयुष्यचं बदललं.
टॅग्स :Educationशिक्षणSocial Mediaसोशल मीडिया