शहरं
Join us  

लाईव्ह न्यूज :

हालाखीच्या परिस्थितीतून केला अविरत संघर्ष; आता वर्षाकाठी ३० लाखांचा व्यवसाय अन् ४० देशात मार्केटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2021 2:13 PM

1 / 11
गुजरातमधील कच्छ जिल्ह्यातील रहिवासी पाबीबेन रबारी या ५ वर्षाची असताना वडिलांनी साथ सोडली. चौथीत असताना शिक्षण सोडले. आई इतरांच्या घरी भांडी घासायची, शेतात काम करायची. कुटुंबात ना कुणी पैसे कमवणारा होता ना उत्पन्नाचा कोणता स्त्रोत होता. तीन बहिणींपैकी मोठी असलेली पाबीबेन खेळण्याच्या वयातच आईबरोबर कामाला जाऊ लागली.
2 / 11
कधी ती शेतात खोदकाम करायची तर कधी ती कुणाच्या घरी झाडू मारायची. दिवसाकाठी विहिरीतून तासभर पाणी भरण्यासाठी तिला एक रुपया मिळायचा. आई आणि मुलगी दिवसभर काम करून थकायच्या तरीही कुटुंबासाठी दोन वेळच्या भाकरीची व्यवस्था करणे देखील एखाद्या डोंगराला पार करण्यासारखे वाटत होते.
3 / 11
मागासवर्गीय समुदायातून आलेला पाबीबेन यांना अनेकदा जगण्यासाठी संघर्ष करावा लागला. परंतु या संघर्षमय जीवनात त्यांनी स्वत:सोबतच आपल्या गावातील महिलांना यशस्वी करण्याची वाटचाल सुरू केली. आज त्यांच्या कलेची मागणी भारतासह जगातील ४० देशांकडून होत आहे. २०० पेक्षा अधिक महिलांना पाबीबेन यांनी रोजगार उपलब्ध करून दिला आहे. हजारो महिलांच्या हाताला काम दिलंय. पाबीबेन यांच्या कंपनीचा टर्नओवर वर्षाकाठी ३० लाख रुपयांचा आहे.
4 / 11
३७ वर्षाच्या पाबीबेन सांगतात की, मला शिकण्याची इच्छा होती. कुटुंबाची आर्थिक अडचण दूर करायची होती. परंतु पैसे नसल्याने चौथीत शिक्षण सोडावं लागलं. संपूर्ण वेळ आईसोबत कामावर जात होती. घरात दोन छोट्या बहिणींचीही देखभाल करावी लागत होती. मी अनेकदा विचार केला मला शिकायचं आहे परंतु गरीबी आणि भूकेमुळे माझ्या हातात काहीच नव्हते.
5 / 11
कमी वयातच माझं लग्न झालं. त्याठिकाणीही अशीच परिस्थिती होती. अडचणींचा सामना करावाच लागत होता. पती शेळी-मेंढींना चरायला घेऊन जायचं काम करत होते. खूपदा जनावरांसोबत दूरपर्यंत जायचे. लग्नानंतर छत्तीसगडमध्ये राहणं कठीण झालं. त्यामुळे पतीला सांगून आम्ही गुजरातला आलो. याठिकाणी किराणा मालाचं दुकानं उघडलं.
6 / 11
पती दुकान सांभाळत होते तर मी ट्रेडिशनल शिवणकाम करण्याचं काम करायचे. आईकडून मी ते शिकले होते. सासरी जाणाऱ्या मुली आम्ही बनवलेल्या शिवणकामाच्या बॅगेतून कपडे घेऊन जायचे. त्यानंतर मोठ्या घरातील मुलींसाठी मी ते काम करू लागले. त्यातून मला पैसे मिळायला लागले. काही महिन्यांनी पाबीबेन एका संस्थेशी जोडल्या गेल्या.
7 / 11
त्या संस्थेकडून आम्हाला कामाचे पैसे मिळत होते. परंतु क्रेडिट मिळत नव्हतं. मोठ्या कंपन्या आमच्याकडून स्वस्तात माल घेऊन तो मोठ्या किंमतीत विकत होत्या. आम्ही मजूरासारखं काम करत होतो. त्यावेळी पतीने आयडिया दिली की, आपण दुसऱ्यांसाठी काम करण्याऐवजी स्वत:साठी काम करून मार्केटिंग करावं. कल्पना चांगली होती परंतु दोघंही अशिक्षित होतो आणि कंपनी सुरु करण्यासाठी पैसेही नव्हते.
8 / 11
पाबीबेन सांगतात की, २०१६ मध्ये मी एका ओळखीच्या निलेश प्रियदर्शी यांना भेटले. ते शिकलेले होते. सर्व गोष्टींचे त्यांना ज्ञान होते. कॉरर्पोरेट आणि ग्रामीण भागात त्यांचा अनुभव होता. त्यांना मी माझी आयडिया सांगितली. त्यानंतर त्यांनी आम्हाला मदत केली. आमच्या कामाची मार्केटिंग केली. काही महिन्यांनी आम्ही पोबीबेन डॉट कॉम नावानं कंपनी सुरू करून ती रजिस्टर केली आणि मार्केटिंग करू लागलो.
9 / 11
पाबीबेन आणि त्यांच्या टीमने सुरुवातीला स्थानिक मार्केटमध्ये व्यवसाय केला. त्यानंतर त्यांच्या कामाचे प्रदर्शन सुरू झाले. अनेक शहरांमध्ये स्टॉल लावून मार्केटिंग करणं सुरूवात झाली. त्यातून चांगला प्रतिसाद मिळाला. एकामागोएक ग्राहक येऊ लागले. हळूहळू कामाचा व्याप वाढला. स्थानिक महिलांना कामावर ठेवलं. त्यासाठी महिलांनाही चांगला पगार दिला.
10 / 11
यानंतर सोशल मीडियाद्वारे मार्केटिंग सुरू केले. स्वत:ची वेबसाईट बनवली आणि देशभरात आमचे प्रोडेक्ट डिलिवरी करू लागलो. कोरोनाकाळात अमेझॉन आणि फ्लिपकार्टवर माल उपलब्ध झाला होता. आता बॅग, शाल, मोबाईल कव्हर्स, पर्ससह ५० पेक्षा अधिक व्हराएटी मार्केटिंग करत आहोत. अमेरिका, जपानसह ४० देशात माल विकला जातो.
11 / 11
देशभरातील अनेक शहरांमधील व्यावसायिकांशी जोडले आहोत. आम्ही बनवलेल्या मालाला बॉलीवूड आणि हॉलीवूडमध्येही जागा मिळाली आहे. नॅशनल आणि इंटरनॅशनल स्तरीय अनेक रिवार्डस मिळाले आहेत. पाबीबेन यांना पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सन्मानित केले आहे. त्याचसोबत केबीसीच्या व्यासपीठावर अभिनेता अमिताभ बच्चन यांच्यासोबतही त्या दिसून आल्या होत्या.
टॅग्स :Inspirational Storiesप्रेरणादायक गोष्टी